Sunny Leone Reaction On Animal : सनी लियोनी म्हणते स्वातंत्र्य हवे ! चक्क दिला 'ॲनिमल' सिनेमाला पाठिंबा, काय आहे कारण ?

साऊथच्या संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमलनं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली (Animal Movie Latest News) असली तरी त्याच्या वाट्याला आलेला वादही दुर्लक्षित करता येणार नाही.
Sunny Leonie Reaction on Animal Movie Ranbir Kapoor
Sunny Leonie Reaction on Animal Movie Ranbir Kapoor esakal

Sunny Leonie Reaction on Animal Movie Ranbir Kapoor : साऊथच्या संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमलनं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली (Animal Movie Latest News) असली तरी त्याच्या वाट्याला आलेला वादही दुर्लक्षित करता येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचा वाद या चित्रपटाला (Bollywood Movies) चिकटला आणि त्यामुळे त्यातील कलाकार, निर्माते चर्चेत राहिल्याचे दिसून आले.

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका (Ranbir kapoor Latest News) असलेल्या ॲनिलवर आता प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनीनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तिनं तिच्या नेहमीच्या (Sunny Leone News) परखड शैलीत ॲनिमलवर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटांविषयी चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडे चित्रपट पाहण्याचा (Bollywood Latest Updates) ऑप्शन होता. तो पाहायचा की नाही याचा आपण विचार करु शकतो. मला असे वाटते की, मनोरंजन हे नेहमीच एखाद्या चक्रासारखे असते. ते फिरुन पुन्हा तुमच्याकडे येते. त्यामुळे पहिल्यांदा मंदी होती तेव्हा लोकं थिएटरमध्ये जात नव्हते. आता चित्र वेगळं आहे. असेही सनीनं सांगितले.

सनीनं ॲनिमल चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यापूर्वी अॅनिमल बाबत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. त्यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, कंगना रनौत आणि कोंकणा सेन शर्मा यांनी टोकदार प्रतिक्रिया दिली होती. तसेच काही सेलिब्रेटींनी हा चित्रपट आपल्याला पूर्ण पाहता आला नाही. तो अर्धवट सोडून जावे लागले. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या सगळ्यात ॲनिमलचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अभिनेत्री सनी लियोनीच्या नावाची भर पडली आहे. सनीनं म्हटलं आहे की, प्रेक्षकांना काय पाहायचे आणि काय पाहायचे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना ते ठरवू द्यावे. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. अशावेळी आपण प्रेक्षकांना त्यांच्या निवडीच्या अधिकारावर दबाव आणता कामा नये. प्रत्येकाचे निवडीचे स्वातंत्र्य आहे.

Sunny Leonie Reaction on Animal Movie Ranbir Kapoor
Main Atal Hoon Twitter Review : सणसणीत, खणखणीत असा 'मैं अटल हू'! सर्वाधिक चर्चा कुणाची होतेय माहितीये?

यावेळी सनीनं असेही म्हटले की, तुमच्यासमोर जे काही येते किंवा त्याविषयी लिहिले जाते त्यावर तुम्ही विश्वास ठेवता कामा नये. तुम्हाला ती योग्य वाटली तरच त्यावर व्यक्त व्हा. अन्यथा कुणी काहीतरी म्हणते आहे म्हणून तुम्ही कौतुक करता असे करणे चुकीचे असल्याचे सनीनं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com