रॉकीच्या चाहत्यांसाठी खुशखबर! KGF-2 चं नवं गाणं 'या' दिवशी होणार रिलीज I Toofan Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KGF 2 Toofan

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.

रॉकीच्या चाहत्यांसाठी खुशखबर! KGF-2 चं नवं गाणं 'या' दिवशी होणार रिलीज

KGF Chapter 2 : कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं KGF 2 च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. हा मोस्ट अवेटेड चित्रपट 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार यश उर्फ ​​रॉकी पुन्हा मेगा कॅनव्हास अॅक्शनसह परतला असून पहिल्या चित्रपटाच्या विक्रमी यशानंतर फिल्म्सच्या निर्मात्यांनी 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार्‍या रिलीजची घोषणा केलीय. चित्रपटाच्या नवीन पोस्टरनं 'तुफान' (Toofan Song) हे पहिलं गाणं लॉन्च करण्याची घोषणा केल्यानं प्रतीक्षा अखेर संपलीय.

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, KGF Chapter 2 च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2 ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथं चित्रपटाचा पहिला भाग संपला होता. KGF 2 मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेलं वचन पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी रॉकी पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याची एक जबरदस्त झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळणार आहे. रॉकी ‘KGF 2’ मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननंही KGF 2 मध्ये एंट्री केलीय. ती यात पंतप्रधानाची भूमिका साकारत आहे. जबरदस्त डायलॉगसह तिच्या व्यक्तिरेखेची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात येणार आहे. यासोबतच श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवीना टंडनची व्यक्तिरेखा कथेतील एक मोठा दुवा ठरणार असल्याचं सांगितलं जातंय. संजय दत्त मुख्य खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा ‘अधीरा’ लूक याआधीच समोर आलाय. ‘अधीरा’ आणि ‘रॉकी’ हे KGF Chapter 2 चे मोठे युएसपी आहेत. होमबेअल फिल्म्सच्या बॅनरखाली प्रशांत नील लिखित आणि दिग्दर्शित आणि विजय किरागंदूर निर्मित अॅक्शन फिल्म 14 एप्रिल 2022 रोजी देशभरात रिलीज होणार आहे.