कुणाल कामरा आणि रचिता तनेजाला सुप्रीम कोर्टाने बजावली कारणे दाखवा नोटीस

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 18 December 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात अपमानास्पद ट्विट केल्याप्रकरणी कामरा आणि तनेजा यांच्या विरोधात 'अवमान केल्याने कारवाई का केली जाऊ नये' या दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय राखून ठेवला होता.

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात अपमानास्पद ट्विट केल्या प्रकरणी कार्टुनिस्ट रचिता तनेज आणि कॉमेडिअन कुणाल कामरालासुप्रीम कोर्टाने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याने या दोघांवर कारवाई का होऊ नये या दाखल झालेल्या याचिकेवर आज कोर्टाने सुनावणी केली.  न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमुर्ती एम. आर.शाह यांच्या खंडपीठाने दोन वेगवेगळ्या नोटीस बजावत त्यांना सहा आठवड्यांची मुदत देऊ केली आहे.  

हे ही वाचा: भरत जाधवची भावनिक पोस्ट, ‘लक्ष्यामामांचा फोन आला आणि..’   

सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात अपमानास्पद ट्विट केल्याप्रकरणी कामरा आणि तनेजा यांच्या विरोधात 'अवमान केल्याने कारवाई का केली जाऊ नये' या दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय राखून ठेवला होता. अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी कामराच्या विरोधात अवमान केल्याची कारवाई सुरु करण्यासाठी सहमती दर्शवत म्हटलं होतं की हे ट्विट वाईट भावनेअंतर्गत केले होते. आणि हीच वेळ आहे की लोंकांनी ध्यानात ठेवावं की सर्वोच्च न्यायालयावर अपराधीपणाने हल्ला केल्यावर न्यायालय अवमान प्रकरणी अधिनियम १९७१ अंतर्गत शिक्षा होऊ शकते.

याचप्रकारे अटॉर्नीने तनेजाविरोधात देखील अवमान कारवाई सुरु करण्यावर सहमती दिली. त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी आणि न्यायालयाप्रती लोकांचा विश्वास कमी करण्याच्या उद्देशाने हे ट्विट केले गेले होते. 

कुणाल आणि रचिता या दोघांवर अवमान कारवाई का करण्यात येऊ नये या याचिकेला कोर्टाने मंजुरी दिली असून दोघांना कारणेे दाखवा नोटीस दिली आहे. या नोटीस अंतर्गत दोघांनाही ६ आठवड्यांच्या आत त्यांचं उत्तर दाखल करावं लागणार आहे. तसंच कोर्टाने सांगितलं आहे की कुणाल आणि रचिता या दोघांनाही यासाठी न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही.   

supreme court issues show cause notices to kunal kamra and rachita taneja  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court issues show cause notices to kunal kamra and rachita taneja