

सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच गेल्या कित्येक महिन्यांपासून गाजत असलेला आणि आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा (sur-nava-dhyas-nava). या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यामुळे हे स्पर्धक जणू एकप्रकारे श्रोत्यांच्या घरातील भाग झाले आहेत. मात्र, लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १३ तारखेला या शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. (sur-nava-dhyas-nava-4-th-season-finale-on-coming-sunday-musical-treat-of-great-marathi-singers)
संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ सुरेल स्पर्धकांनी महाअंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. मात्र, आता या १६ पैकी ६ जणी महाअंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. त्यामुळेच प्रत्येकाचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ६ पैकी कोणता स्पर्धक विजयी होणार आणि महाराष्ट्राला नवी महागायिका मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.
येत्या १३ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार असून यावेळी लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर हेदेखील परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
महाअंतिम फेरीत पोहोचल्या 'या' ६ जणी
सन्मिता धापटे – शिंदे (अहमदनगर), प्रज्ञा साने(डोंबिवली),राधा खुडे(बारामती), श्रीनिधी देशपांडे (पुणे), रश्मी मोघे (पुणे), संपदा माने (कोल्हापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.