''सुरज पे मंगल भारी''चा ट्रेलर पाहिलायं; मनोज वाजपेयीची भूमिका ठरणार लक्षवेधी

suraj pe mangal bhari trailer out
suraj pe mangal bhari trailer out

मुंबई - सुरज पे मंगल भारीचा ट्रेलर बुधवारी व्हायरल झाला. अल्पावधीतच त्याला  लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे. यात मनोज वाजपेयीची अतरंगी, खुशखुशीत, नर्मविनोदी प्रकारची भूमिका या चित्रपटाच्या निमित्ताने दिसत आहे. यात अनेक कलाकारांची भूमिका पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मनोज वाजपेयीने ट्रेलर रिलिज झाल्याचे त्याच्या सोशल अकाऊंट वरुन सांगितले आहे. या चित्रपटात दिलजित दोसांझ, अन्नु कपूर, फातिमा सना शेख यांच्या भूमिका आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर तो विनोदी चित्रपट असल्य़ाचे कळते. मनोज वाजपेयी आणि अन्नु कपूर यांचा अभिनय पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. झी स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिलजित दोसांजही सहभागी झाला आहे. तर फातिमा सना शेख एका वेगळ्या लूक मध्ये दिसत आहे. आतापर्यत या ट्रेलरला 4 लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.

दिलजित दोसांज हा लग्नासाठी एका मुलीच्या शोधात आहे. तर त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हच्या भूमिकेत मनोज वाजपेयी दिसणार आहे. चित्रपटात वाजपेयी हा मधूर राणे या पात्राची भूमिका करत आहे. ज्याचे काम नव-या मुलाची जासूसी करणे हे आहे. दुसरीकडे फातिमाने एका मराठी मुलीची भूमिका केली आहे. जिला आपण स्वत तयार केलेल्या नियमांवर जगायला आवडते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com