Surekha Sikri: नजरेत धाक आणि आवाजात जरब.. 'त्या'वेळी सुरेखा सिक्री यांनी सरकारलाही धरलं होतं धारेवर..

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचा आज वाढदिवस..
Surekha Sikri birth anniversary news she slams the government in lockdown
Surekha Sikri birth anniversary news she slams the government in lockdownsakal

Surekha Sikri birth anniversary: हिंदी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री सुरेखा सिक्री. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका त्यांच्या अभिनयाने गाजल्या आहेत. त्यांच्या भूमिकांसाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

डोळ्यात धाक आणि आवाजात जरब असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांची 'बालिका वधू' ही मालिका इतकी गाजली की घराघरात त्यांच्या भूमिकेची चर्चा झाली. अशा सुरेखा यांनी दोन वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. आज त्यांचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने पाहूया एक खास बात..

(Surekha Sikri birth anniversary news she slams the government in lockdown)

Surekha Sikri birth anniversary news she slams the government in lockdown
Arshad Warsi Birthday: सेल्समन, कोरिओग्राफर ते अभिनेता; अशा प्रकारे 'सर्किट'ने बॉलिवूडमध्ये कमावलं मोठं नाव

सुरेखा या अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही पुढे होत्या. अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत त्या संलग्न होत्या. त्या अभिनयात जितक्या खऱ्या होत्या तितक्या खऱ्या आयुष्यात ही स्पष्ट बोलणाऱ्या होत्या. त्यांना अनेकजन आदराने दबकून असायचे. कलाकारांचं काय त्यांनी थेट सरकारलाही खडेबोल सुनावले होते.

झाले असे की,सरकारनं कोरोनामुळे 65 वर्षांवरील कलाकारांना काम करण्यास मनाई केली होती. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या रोजगाराचं काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला होता. एवढेच नाही तर सर्व वयोवृद्ध कलाकारांची व्यथा त्यांनी मांडली होती.

त्या म्हणाल्या होत्या, ''लॉकडाउनमुळे मी आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. ज्या मालिकांमध्ये काम केलं त्यांचे पैसे मला अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी जवळ चार पैसे नाहीत. मात्र मला माझ्या समस्यांची जाहीरात करायची नाही. कारण मला कोणाकडूनही दान नकोय मला फक्त काम हवंय.''

''सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांसाठी लागू केलेला हा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी हा नियम त्वरीत रद्द करावा, जेणेकरुन आम्ही जेष्ठ कलाकार देखील काम करुन आपलं पोट भरु शकू,'' अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले होते.

सुरेखा सिक्री या बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. 1978 साली ‘किस्सा कुर्सीका’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नसीब’, ‘सरफरोश’, ‘हेरा फेरी’, ‘देवडी’, ‘बधाई हो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

चित्रपटांशिवाय मालिकांमध्येही त्यांनी प्रचंड काम केलं आहे. 1990 साली सांझा ‘चूल्हा’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘कभी कभी’, ‘बुनियाद’, ‘सीआयडी’, ‘केहना है कुछ हमको’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये त्यांनी काम होतं. 'बालिका वधू' मालिकेतील त्यांचे काम आजही कोणी विसरू शकलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com