सुशांतचे कुटुंबिय संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 10 August 2020

संजय राऊत यांनी केके सिंह यांच्यावर लावलेले हे आरोप खोटे आहेत असं त्याने म्हटलंय. तसंच यामुळे नाराज असलेल्या नीरज यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सुशांतसिंह राजपूतच्या केसप्रकरणी अनेक दावे केले आहेत. त्यांनी या प्रकरणात म्हटलं होतं की सुशांतचे वडिल के के सिंह यांच्या दुस-या लग्नामुळे त्यांचे त्यांच्या मुलासोबत चांगले संबंध नव्हते. याशिवाय संजय राऊत यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला देखील या प्रकरणात ओढलंय. त्यांच्या या जबाबावर सुशांतचा चुलत भाऊ नीरज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी केके सिंह यांच्यावर लावलेले हे आरोप खोटे आहेत असं त्याने म्हटलंय. तसंच यामुळे नाराज असलेल्या नीरज यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा: अँबुलन्स अटेंडंटचा खुलासा, सुशांतच्या मृतदेहाविषयी सांगतली 'ही' महत्वाची गोष्ट

सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ भाजप आमदार नीरज हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कौटुंबिक प्रकरणात या प्रकारचा लाजिरवाणा आरोप लावणं निंदनीय आहे. यामुळे आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहोत. सुशांतचा भाऊ नीरजचं म्हणणं आहे की संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांची दोन लग्न झाली आहेत असं म्हटलं होतं जे चुकीचं आहे. जर त्यांनी यासाठी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला जाईल. यासाठी कुटुंबाकडून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. 

इतकंच नाही तर सुशांतचे काका प्रोफेसर देव किशोर सिंह यांनी देखील हे संजय राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं की 'आमचा सगळ्यात मोठा भाऊ रामकिशोर सिंह यांची दोन लग्न झाली आहेत. रामकिशोर सिंह हे आमदार नीरज कुमार बबलुचे वडिला आहेत. सुशांतच्या वडिलांचं केवळ एकंच लग्न झालं आहे. त्यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. हे सगळं तपास भरकटवण्यासाठी केलं जात आहे.'  

sushant cousin bjp mla neeraj to file defamation case on sanjay raut shivsena leader  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant cousin bjp mla neeraj to file defamation case on sanjay raut shivsena leader