esakal | ''रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांमधीलंच कुणीतरी मदत करतंय''
sakal

बोलून बातमी शोधा

rhea chakraborty

सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांमध्येच असं कोणीतरी आहे जो रियाला मदत करत आहे. 

''रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांमधीलंच कुणीतरी मदत करतंय''

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात अर्ज केला. या अर्जामध्ये या प्रकरणाचा तपास पटना पोलिसांकडून काढून घेऊन तो मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करावा अशी मागणी रियाने केल्याचं म्हटलंय. या प्रकरणावर बोलताना सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांमध्येच असं कोणीतरी आहे जो रियाला मदत करत आहे. 

हे ही वाचा: शिक्षण पद्धतीच्या बदललेल्या निर्णयावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, 'दहावी बारावीचा तेरावा घातला आता तरी..' 

वकिल विकास सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, 'रियाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे मात्र तिने सीबीआय चौकशीची मागणी देखील करायला हवी होती. एफआयर पटनामध्ये दाखल केली आहे आणि आता तीने सुप्रीम कोर्टात हा तपास थांबवण्याचा आणि मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करण्याचा अर्ज केला आहे. यापेक्षा जास्त काय पुरावा हवा की मुंबई पोलिसांमधील कोणीतरी तिची मदत करत आहे.'

इतकंच नाही तर त्यांनी आणखीही काही धक्कादायक खुलासे केले. माहितीनुसार, 'सुशांतच्या कुटुंबियांनी या दुःखद घटनेच्या ४ महिने आधीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये असं म्हटलं गेलं होतं की सुशांतसोबत काही चुकीची माणसं जोडली गेली आहेत. आणि त्यांना भिती आहे की सुशांतसोबत काही वाईट घडू नये.'

सुशांतच्या कुटुंबाने २५ फेब्रुवारी २०२० ला बांद्रा पोलीस स्टेशनला सूचना दिली होती की 'सुशांत चांगल्या लोकांसोबत नाहीये. तेव्हा त्याच्यासोबत काही वाईट घडणार नाही याकडे लक्ष द्या.'नुकतीच सुशांतच्या केसमध्ये सीबीआय तपासाची मागणी करणारी याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.  

sushant family lawyer has reportedly alleged that somebody in the mumbai police is helping rhea chakraborty