दिशा सालीयानचा 'तो' व्हिडिओ मृत्युआधीचा व्हिडिओ म्हणून होतोय व्हायरल

disha salian
disha salian

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युवर सुरुवातीपासूनंच संशय व्यक्त केला जात होता की त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्युसोबत याचा काहीतरी संबंध आहे. मात्र मुंबई पोलिसांनी ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असून आत्महत्या असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे बिहार पोलिसांनी आरोप केला आहे की दिशा सालीयनच्या कथित आत्महत्येचं प्रकरण सुशांतच्या मृत्युशी संबंधित असू शकतं.  

आता दिशा सालियानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती पार्टी करताना दिसत आहे. असा दावा केला जातोय की हा व्हिडिओ दिशाच्या मृत्युच्या काही वेळापूर्वीचा आहे. हा व्हिडिओ दिशाने स्वतः तिच्या मित्र-मैत्रीणींना व्हॉट्सअप केला होता. मात्र हा व्हिडिओ दिशाच्या मृत्युच्या काही वेळापूर्वीचा आहे की इतर कोणत्या दिवशीचा आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हे देखील स्पष्ट झालेलं नाही की हा व्हिडिओ कोणी लीक केला आहे. 

मुंबई पोलिसांवर सुरुवातीपासूनंच दिशा सालीयनच्या केसमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत आहे. मुंबई पोलिसांवर आरोप आहे की त्यांनी मृत्युनंतर २ दिवसांनी तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं. याशिवाय तिचं शरिर, नखे आणि कपड्यांद्वारे फॉरेन्सिक पुरावे देखील जमा केलेा नसल्याचे आरोप केले गेले आहेत. कोणताच व्हिडिओ किंवा फोटो घेतलेला नाही. असं देखील म्हटलं जातंय की मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झाल्यानंतर ४ दिवसांनी तिचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालीयानच्या मृत्युच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्या होणा-या नव-यासोबतंच आणखी ६ जण होते. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, दिशा पार्टीमध्ये नशेत होती तसंच डिप्रेस देखील होती. त्यानंतर तिने स्वतःला बेडरुममध्ये बंद केलं आणि काही वेळानंतर १४ व्या मजल्यावरुन तीने उडी मारली. मित्रांनी सांगितलं की बिल्डिंगवरुन पडल्यानंतरही दिशा जीवंत होती मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिचा मृत्यु झाला.   

sushant singh rajput case last video of disha salian partying with friends gets leaked  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com