सुशांत सिंह राजपूत करतोय 'या' अभिनेत्रीला डेट, सिक्रेटली फिरत आहेत पॅरिसमध्ये !

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चा होण्याची गोष्टही तशी खासच आहे कारण, सुशांत सध्या पॅरिसमध्ये वेकेशन एन्जॉय करतोय तेही गर्लफ्रेंडसोबत!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चा होण्याची गोष्टही तशी खासच आहे कारण, सुशांत सध्या वेकेशन एन्जॉय करतोय तेही गर्लफ्रेंडसोबत! कोण आहे ही सिक्रेट गर्लफ्रेंड असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mickey in Disneyland ! #livingMyDreams #lovingMyDreams 

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत डेट करत आहे. सुशांत आणि रिया पॅरिसमध्ये एकत्र फिरत आहेत. मात्र याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. दोघांनी एकमेकांच्या अकाउंटवर पॅरिसचे फोटो अपलोड केले आहेत. त्यामध्ये दोघांचे एकत्र फोटो नाहीत पण, सुशांतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे ज्यात तो 'डिस्नीलॅंड' मध्ये एन्ट्री करताना दिसतोय. हा व्हिडीओ कोणीतरी मागून शुट केला आहे. रियादेखील पॅरिसमधील फोटो इन्स्टाग्रामववर अपलोड करत आहे.

एकुणच या सर्व गोष्टींमुळे सुशांत आणि रिया एकत्र पॅरिसला गेले आहेत अशी चर्चा बी- टाउनमध्ये आहे. सुशांत आणि रियाने ते डेट करत असल्याची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र याआधीदेखील पॅपराजींच्या कॅमेरामध्ये ते एकत्र स्पॉट झाले होते. डिनर डेट असो किंवा एअरपोर्ट हे लव्हबर्डंस् एकत्र दिसले. काही महिन्यांपूर्वी सुशांत आणि रिया लडाखमध्ये एकत्र फिरायला गेले होते. वाढदिवसानिमित्त रियाने तिच्या काही जवळच्या मित्रांसह लडाखमध्ये सेलिब्रेशन केलं. त्यावेळीही सुशांत आणि रियाने एकत्र फोटो अपलोड केला नाही. मात्र दोघांनीही एकाचप्रकारचे फोटो अपलोडे केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

An ounce of innocence, a pinch of laughter. #ladakh

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

याचवर्षीच्या सुरुवातीला दोघांनी डेट करण्यास सुरुवात केली. एकत्र पब्लिक अपिअरन्स केल्यावर या कपलच्या लग्नाच्या चर्चेलाही उधाण आले. एका मुलाखतीदरम्यान सुशांतला रियाविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी रिलेशनशिपसंबंधी तो जास्त बोलला नाही पण पूर्णपणे नकारही दिला नाही. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सुशांतला त्याच्या लेडीलव्हला जीवनसाथी करायचं आहे. पण, रिलेशनशिपला वेळ देत रियाला त्याचं खरं प्रेम सिद्ध करायचं आहे. रिया लग्नासाठी वेळ घेत आहे. अशी माहिती समोर आली होती. 

याआधी सुशांत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने करीअरला सुरुवात केली ती छोट्या पडद्यावरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने. या सिरिअलमधील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकिता लोखंडेला सुशांत डेट करीत होता. अनेक वर्ष ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. काही कारणांनी दोघांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतरही सुशांतचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिती सॅननशी जोडलं गेलं होतं. 

सुशांतचा 'छिछोरे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. लवकरच तो नेटफ्लिक्सच्या 'ड्राईव्ह' या चित्रपटातून झळकणार आहे. तर रिया 'जलेबी, 'बॅंक चोर', 'दोबारा' आणि 'हाल्फ गर्लफ्रेंड' या चित्रपटांतून दिसली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput dating this actress and vacationing secretly