'केदारनाथ'च्या पुन:प्रदर्शनावर चाहते नाराज, 'आणखी किती दिवस सुशांतला विकाल?' नेटकऱ्यांचा सवाल!

kedarnath
kedarnath

मुंबई : सध्या देशभरात 'अनलॉक'चा ५ वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या चित्रपटाचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून नफा मिळवण्याच्या प्रयत्न सुरू झाल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चित्रपटगृह पुन्हा उघडल्यानंतर काही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातील, असं ट्विट करत त्यांनी सांगितलं. या चित्रपटांमध्ये सुशांतच्या 'केदारनाथ' चित्रपटाचा देखील समावेश करण्यात आला आहे. 'केदारनाथ'सह 'तान्हाजी', 'शुभमंगल ज्यादा सावधान', 'मलंग' आणि 'थप्पड' हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत.


चाहत्यांचा पारा चढला!
तरण आदर्श यांच्या ट्विटवर सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट करत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना एका युजरने लिहिलं की, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर या लोभी निर्मात्यांना एसएसआरच्या नावावर भरपूर पैसे कमवायचे आहेत. नफा मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, परंतु प्रेक्षक आता इतके मूर्ख नाहीत. '#Kedarnath #ShameOnBollywood' लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे.

तर दुसर-या एका युजरने लिहिलं, 'जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा त्याच्या 'केदारनाथ' चित्रपटाला स्क्रीन मिळत नव्हत्या आणि आता तो नसताना त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात काहीच अर्थ नाही? सुशांतला याचा फायदा होईल का? बॉलिवूडने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे.' याचबरोबर 'आणखी किती दिवस सुशांतला विकाल?', असा प्रश्न करत नेटकऱ्यांनी या पुनर्प्रदर्शनाला आपला विरोध दर्शवला आहे.

sushant singh rajput fans angry on kedarnath rerelease decision  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com