सुशांतच्या मृत्युआधीच विकिपीडीयावर त्याची वेळ अपडेट?

टीम ई सकाळ
बुधवार, 1 जुलै 2020

१४ जुन रोजी सकाळी ९ ते ९.३० च्या आसपास सुशांतच्या विकिपीडिया पेजवर हे अपडेट करण्यात आलं होतं की त्याने आत्महत्या केली आहे.

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीनंच गोष्टी समोर येत आहेत. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही मात्र दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. चाहत्यांना सुशांतने आत्महत्या केली हे सहन होत नाहीये. त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. सुशांतचे चाहते त्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करत आहेत. आता तर सोशल मिडियावर काही जणांचं म्हणणं आहे की सुशांत सिंह राजपूतच्या मरणाआधीच विकिपीडिया अपडेट झालं होतं.

हे ही वाचा: 'या' व्यक्तीला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेड्स

१४ जुन रोजी सकाळी ९ ते ९.३० च्या आसपास सुशांतच्या विकिपीडिया पेजवर हे अपडेट करण्यात आलं होतं की त्याने आत्महत्या केली आहे. परंतु सुशांतच्या आत्महत्येची माहिती दुपारी १ ते २च्या दरम्यान आली होती. सुशांतचे चाहते सोशल मिडियावर आयपी ऍड्रेस देखील शेअर करत आहेत ज्याच्या माध्यमातून सुशांतच्या आत्महत्येच्या सकाळी त्याचं विकिपीडिया पेज अपडेट झालं असावं.

विशेष म्हणजे ही अपडेट सकाळी ९ वाजून ८ मिनिटांची आहे. सुशांत यावेळी घरातंच होता त्याच्या मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे तो ९.३० वाजता रुममधून बाहेर आला होता. त्यानंतर तो १० वाजता रुममध्ये गेला तो परत आलाच नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शक्यता सुशांतचे चाहत्यांना आहे. या प्रकरणात योग्य तो तपास होण्यासाठी सुशांतचे चाहते अमित शहा यांच्याकडे मदतीचा हात मागत आहेत.

ट्विटवर #AmitShahDoJusticeForSSR हा हॅशटॅग ट्रेंड होत असून सीबीआय तपासाची मागणी होत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात २८ जणांंचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र अनेकजण या प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे द्यावी अशी सतत मागणी करत आहेत. अभिनेता शेखर सुमननेही या प्रकरणात सीबीआयने लक्ष घालावं अशी विनंती केली आहे.   

sushant singh rajput fans asked how his wikipedia updated before death  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput fans asked how his wikipedia updated before death