esakal | सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी अपूर्णच!
sakal

बोलून बातमी शोधा

sushant dream list

सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी अपूर्णच!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'पवित्र रिश्ता' Pavitra Rishta मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याने स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं होतं. कमी वयात सुशांतने यशाची शिखरं गाठली होती, मात्र तो आज आपल्यात नाही, ही भावनाच त्याच्या अनेक चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाते. १४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सुशांतने अनेक स्वप्नं त्याच्या उराशी बाळगली होती. या स्वप्नांची यादी त्याने २०१९ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या यादीत त्याने त्याची ५० स्वप्नं लिहिली होती. (sushant singh rajput fifty dreams list viral on social media)

या यादीतील काही स्वप्नं तो हळूहळू पूर्ण करत होता. मात्र ही ड्रीम लिस्ट पूर्ण होण्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. विमान उडवणं ही त्याची या यादीतील पहिली इच्छा होती. तर ट्रेनद्वारे युरोप दौरा करायचा ही त्याची यादीतील शेवटची इच्छा होती. 'माझी ५० स्वप्नं आणि ही संख्या वाढतच राहील', असं कॅप्शन देत सुशांतने ही यादी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

काय होती सुशांतची स्वप्नं?

विमान उडवण्याचं प्रशिक्षण, आयर्नमॅन ट्रायथलॉनचं (स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणे, जंगलात एक आठवडा राहणे, कमीत कमी १० विविध नृत्यप्रकार शिकणे, शेती करायला शिकणे, आवडती ५० गाणी गिटारवर वाजवणे, एक लॅम्बॉर्गिनी ही आलिशान गाडी विकत घेणे, स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित माहितीपट तयार करणे, क्रिकेट खेळणं, मार्स कोड (टेलिकम्युनिकेशन लँग्वेज) शिकणे, अंतराळाविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणे, एक हजार वृक्षारोपण करणे, दिल्लीतल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक संध्याकाळ व्यतीत करणे, कैलाश पर्वतावर बसून ध्यानधारणा करणे, एक पुस्तक लिहिणे, सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्ज करणे, अशी स्वप्नं सुशांतने या यादीत लिहिली होती.

सुशांतची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा अभिनेत्रीचा निर्धार

'दिल बेचारा' या सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारी अभिनेत्री आणि त्याची मैत्री संजना संघी हिने सुशांतची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित संजनाने सुशांतची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार केला. 'मी तुला वचन देते, तुझी अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेन. तू वचन दिलं होतंस की आपण एकत्र ही स्वप्नं पूर्ण करू, मात्र आता मला तुझ्याशिवाय ही स्वप्नं पूर्ण करावी लागणार आहेत', अशा शब्दांत संजनाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

loading image
go to top