सुशांतच्या आत्महत्येवर आधारित 'सुसाईड ऑर मर्डर' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, सप्टेंबरमध्ये सुरु होणार शूटींग..

suicide or murder
suicide or murder

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई पोलीस त्याच्या मृत्युचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे सुशांतच्या याच आत्महत्येवर आधारित सुसाईड ऑर मर्डर या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांनंतरच या घटनेवर सिनेमा करणार असल्याची घोषणा निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी केली होती. 

निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, 'या सिनेमाच्या स्क्रीप्टवर जवळपास ५० टक्के काम झालं आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत याची स्क्रीप्ट पूर्णपणे तयार असेल. १६ सप्टेंबरपासून पुढचे ५० दिवस आम्ही या सिनेमाचं शूटींग मुंबई आणि पंजाबमध्ये करणार आहोत. हा सिनेमा बॉलीवूडमध्ये पसरलेल्या घराणेशाही आणि इंडस्ट्रीतील माफिया यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी बनवली जात आहे.'

सुशांतच्या नावाचा फायदा घेण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'मी त्यांच्या नावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी केवळ हा प्रयत्न करतोय की सुशांतसोबतची घटना कोणा दुस-यासोबत होऊ नये जे याआधी जिया खान आणि दिव्या भारतीसोबत झालं. मी एका अशा अभिनेत्रीला भेटलो आहे जिने ११ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जर कोणी आऊटसाईडर आमच्या इंडस्ट्रीमध्ये येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं काहीतरी कारण असेल. आमच्या इंडस्ट्रीमध्ये माफिया गँग चालते.'

विजय शेखर गुप्ता पुढे असंही म्हणाले की, 'सुशांत हा केवळ एकंच असा अभिनेता नाहीये ज्याच्यासोबत असं घडलं आहे. या सिनेमात अशा ९ ते १० लोकांच्या कथांचा समावेश आहे. हा सिनेमा तीन तासांचा असेल. या प्रकरणात ज्या लोकांची चौकशी झाली त्यांच्यापासून प्रेरित पात्र या सिनेमात दाखवली जातील.'

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये राहणारा सचिन तिवारी यात सुशांतची भूमिका साकारतोय.  सुशांतचा डुप्लिकेट म्हणून सोशल मिडियावर तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. 'हा सिनेमा बायोपिक नसल्याने कोणीही यावर आक्षेप घेणार नाही. हा सिनेमा सुशांतच्या जीवानाशी प्रेरित असेल तसंच बॉलीवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा यात केला जाईल' असं विजय शेखर गुप्ता यांनी सांगितलं.   

sushant singh rajput life inspired film suicide or murder first poster released  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com