esakal | सुशांतच्या आठवणीत उषा नाडकर्णी झाल्या भावूक, म्हणाल्या “मी माझा...”
sakal

बोलून बातमी शोधा

SUSHANT USHA NADKARNI

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सुशांतच्या सहकलाकार उषा नाडकर्णी सुशांतच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत.

सुशांतच्या आठवणीत उषा नाडकर्णी झाल्या भावूक, म्हणाल्या “मी माझा...”

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता पाच महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सुशांतच्या सहकलाकार उषा नाडकर्णी सुशांतच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत. सुशांतची पहिला मालिका ज्यातून तो घराघरात पोहोचला त्या पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतच्या आईची भूमिका उषाताईंनी साकारली होती. 

हे ही वाचा: अभिनेता चंकी पांडेच्या मुलीनंतर भाची अलाना पांडेच्या सौंदर्यावर चाहते फिदा    

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'झी रिश्ते' या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांचा पुरस्कार सुशांतला समर्पित केला. शिवाय त्याच्या आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या. त्यांचे ओघळणारे अश्रू पाहून वातावरण देखील भावूक झालं. उषा नाडकर्णी यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांतसोबत काम केलं होतं. त्यांनी सुशांतच्या आईची भूमिका साकारली होती. जवळपास पाच वर्ष ही मालिका सुरु होती. याच मालिकेमुळे सुशांत घराघरात पोहोचला. 

उषाताई आणि सुशांत या दोघांमध्ये या मालिकेमुळे आई-मुलाचंच नातं निर्माण झालं होतं. सुशांत उशा नाडकर्णी यांचा खूप आदर करायचा. त्यामुळे अचानक झालेल्या सुशांतच्या मृत्यूमुळे उषा नाडकर्णी यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी त्यांचं दु:ख याआधी देखील अनेकदा व्यक्त केलं होतं मात्र  या पुरस्कार सोहळ्यात त्या सुशांतला पुरस्कार समर्पित करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला.  त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील.

sushant singh rajputs onscreen aai in pavitra rishta usha nadkarni breaks down while remembering the late actor  

loading image
go to top