सुशांतचा अंतिम संस्कारादरम्यानचा 'तो' व्हिडिओ पाहून चाहत्यावर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली 'आत्ताच्या आत्ता डिलीट करा'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 29 September 2020

सोशल मिडियावर सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडिओ पाहून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे खूपंच दुःखी आहे. हा व्हिडिओ शेअर करणा-यावर अंकिता चांगलीच भडकली आहे. 

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने उलटून गेले. या तीन महिन्यात त्याच्या मृत्युशी संबंधित अनेक गोष्टींवर तपास सुरु आहे. सध्या सुशांत मृत्यु प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या एजंसी वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत.मात्र अजुनही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की सुशांत आत्महत्या केली की त्याची हत्या झालीये. या प्रकरणी अजुनही तपास सुरु आहे. चाहते आणि सुशांतचे कुटुंबिय अजुनही याच आशेवर आहेत की सत्य समोर येईल. या दरम्यान सोशल मिडियावर सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडिओ पाहून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे खूपंच दुःखी आहे. हा व्हिडिओ शेअर करणा-यावर अंकिता चांगलीच भडकली आहे. 

हे ही वाचा: पायल घोषने राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट, जिवाला धोका असल्याचं सांगत केली 'ही' मागणी  

ट्विटवर एका युजरने सुशांतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतवर अंतिम संस्कार सुरु आहेत. यात सुशांतचा मृतदेह दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करताना युजरने लिहिलंय की, 'मला हा व्हिडिओ शेअर करण्याची इच्छा नव्हती मात्र मी या कारणासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे की जर कधी कोणाला बॉलीवूडचे सिनेमे पाहण्याची इच्छा झाली तर हा चेहरा लक्षात ठेवा.' या युजरने हा व्हिडिओ पोस्ट करत यात सुशांत सिंहची बहीण श्वेता आणि अंकिता लोखंडेसोबतंच केआरके पर्यंत अनेकांना टॅग केला आहे. 

युजरने शेअर केलेला सुशांतचा हा व्हिडिओ पाहून अंकिताला राग आला. तिने त्याला रिट्विट करत म्हटलं, 'तुम्ही बरे आहात ना? असे व्हिडिओ शेअर करणं बंद करा. आम्हा सगळ्यांसाठी हे पाहणं खूप कठीण आहे. तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट करा. आम्हाला माहित आहे की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता परंतु समर्थन करण्याचा हा योग्य मार्ग नाही. मी हात जोडून विनंती करते की हा व्हिडिओ डिलीट करा.

sushants fan shares disturbing video of late actors dead body ankita slams netizen for insensitive act  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushants fan shares disturbing video of late actors dead body ankita slams netizen for insensitive act