
नवी दिल्ली : अभिनेत्री सुष्मिता सेनने सध्या सार्डिनियामध्ये सुट्टीवर गेली आहे. सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सार्डिनियामधील तिच्या सुट्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर तिचे बॉयफ्रेंड आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी खास कमेंट केली आहे. (Sushmita Sen and Lalit Modi news in Marathi)
अभिनेत्री सुष्मिताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. ज्यामध्ये ती खोल समुद्रात डुबकी मारताना दिसते. पोस्टमध्ये सुष्मिता म्हणते, तयार व्हा, थांबा, श्वास घ्या...आता जाऊ द्या!!!. शरणागती, मी भूमध्य समुद्राच्या कुशीत असल्याचं अनुभवतेय!! . तिच्या या पोस्टवर ललित मोदी यांनी कमेंट केली. मोदी म्हणाले, 'लुकींग हॉट इन सार्डिनिया'. सुष्मिताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टचे अनेकांनी कौतुक केलं आहे.
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी(Lalit Modi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री सुश्मिता(Sushmita Sen) सोबतचं आपलं नातं जगजाहीर केलं होतं. आम्ही दोघे एकमेकांनी डेट करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. १४ जुलै रोजी ही पोस्ट सोशल मीडियावर पडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट आणि मिम्सचा पाऊस पडला होता.
दरम्यान त्याच्या दुसऱ्या दिवशी १५ जुलै रोजी सुश्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या दोन मुलींसोबतचा एक क्युट फॅमिली फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळीकडे आनंद भरलेला आहे. मी लग्न केलेलं नाही,ना कुठल्याही अंगठीचा स्वीकार केला,याक्षणी मी फक्त एवढंच सांगेन माझ्या सभोवताली प्रेमच प्रेम आहे. मला वाटतं इतकं स्पष्टिकरण पुरेसं आहे. आता पुन्हा मी बिझी होईन माझ्या आयुष्यात आणि कामात. माझ्या आनंदात कायम तुम्ही सारे सहभागी असता त्याबद्दल धन्यवाद. माझं माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.