Sushmita Sen: 'ते' टाळी का वाजवतात? वर्ल्ड ट्रान्सजेंडर दिनी सुश्मिता सेनच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

सुश्मिता आणि तृतीयपंथी गौरी सावंत यांनी एकत्र येत केला खास व्हिडिओ..
Sushmita Sen shares an inspiring video on International Transgender Day of Visibility with gauri sawant
Sushmita Sen shares an inspiring video on International Transgender Day of Visibility with gauri sawantsakal

Sushmita sen: काही वर्षांपूर्वी 'विक्स' कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी समोर आली. ती म्हणजे गौरी सावंत. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांचं म्हणणं या जाहिरातीतून जगासमोर आलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं.

त्यानंतर गौरीने भोगलेलं दुःख, तिचा संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्याव्यवसाय हे सारंच जगासमोर आलं. आज हाच संघर्ष वेब सिरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे.

''ताली'' असं या वेबन सिरिजचे नाव असून मराठी दिग्दर्शक रवी जाधव ही वेब सिरिज दिग्दर्शित करणार आहे. तर अभिनेत्री सुश्मिता सेन, गौरी सावंतची म्हणजे तृतीयपंथीयांची भूमिका साकारणार आहे.

आज एका खास औचित्याने सुश्मिताने एक व्हिडिओ शेयर केला आहे.

(Sushmita Sen shares an inspiring video on International Transgender Day of Visibility with gauri sawant)

Sushmita Sen shares an inspiring video on International Transgender Day of Visibility with gauri sawant
Kiran Mane: मानाकी हमारी.. किरण मानेनं अपूर्वासाठी म्हंटला खास शेर.. तेही साताऱ्यात..

आज वर्ल्ड ट्रान्सजेंडर व्हिजिबलिटी दिवस.. तृतीयपंथिय समाजासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. त्यात सुश्मिता (Sushmita sen) लवकरच 'ताली' मधून गौरी सावंत या तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. म्हणून थेट गौरी सावंत सोबत सुश्मिताने एक व्हिडिओ शेयर करत लोकांना चांगला संदेश दिला आहे.

या व्हिडिओ मध्ये गौरी म्हणते, ''क्यों बजती है ताली? बस कुछ रुपये मांगने के लिए? आपका ध्यान खिचने के लीये.. अपना गुस्सा निकालने के लिए.. या घुटन छिपाने के लिए? क्या इसके लीये बजती है ताली..''

त्यावर सुश्मिता म्हणते, नही.. अब ताली बजेगी.. हौसला बढ़ाने लिए, एक नई पहचान दिलाने के लिए, गुंजसे आसमान हिलाने के लिए.. सिर्फ हात नही दिल से दिल को मिलाने के लिए..'' हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com