Sushmita sen: सुष्मिता सेन साकारणार तृतीयपंथीयांच्या भूमिका, येतेय 'गौरी सावंत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen to play transgender Gauri Sawant in biopic Taali

Sushmita sen: सुष्मिता सेन साकारणार तृतीयपंथीयांची भूमिका, येतेय 'गौरी सावंत'

Sushmita sen: काही वर्षांपूर्वी 'विक्स' कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी समोर आली. ती म्हणजे गौरी सावंत. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांचं म्हणणं या जाहिरातीतून जगासमोर आलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर गौरीने भोगलेलं दुःख, तिचा संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्याव्यवसाय हे सारंच जगासमोर आलं. आज हाच संघर्ष वेब सिरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे. ''टाली'' असं या वेबन सिरिजचे नाव असून मराठी दिग्दर्शक रवी जाधव ही वेब सिरिज दिग्दर्शित करणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री सुश्मिता सेन गौरी सावंतची म्हणजे तृतीयपंथीयांची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सध्या बरीच चर्चेत आहे. तिची ‘आर्या’ वेब सिरिज असो किंवा ललित मोदी प्रेमप्रकरण. आपल्या शानदार अभिनयाच्या जोरवर सुश्मिताने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण तिच्या धाडसी आणि सडेतोड बोलण्यामुळे तिने बॉलीवुडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता सुश्मिता लवकरच एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेब सीरिजचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये सुश्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

आजवर तृतीयपंथीयांचा अभिनय पुरुष अभिनेत्यानेच केलेला आपण पाहिला आहे. पण पहिल्यांदाच एक अभिनेत्री तृतीय पंथीयाची भूमिका करणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिजमधील फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. तिचा लूक पाहून ती सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. आता 'गौरी सावंत' साकारणे हे सुश्मिता साठी मोठे आव्हान असणार आहे. सुश्मिताने गौरीच्या लुक मधील फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. 'टाली - बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी !' असे तिने म्हंटले आहे. आता या वेब सिरिजचा टीझर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ravi jadhavsushmita sen