Suyash Tilak: आता सुयश टिळकला 'कार्तिक देवराज अण्णा' म्हणायचं.. नवा लुक पहा म्हणजे कळेल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suyash tilak new role play kartik devraj in jeevachi hotiya kahili serial on sony marathi

Suyash Tilak: आता सुयश टिळकला 'कार्तिक देवराज अण्णा' म्हणायचं.. नवा लुक पहा म्हणजे कळेल..

suyash tilak: सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणनकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे.

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण लवकरच त्यांच्यावर एक मोठे संकट ओढवणार आहे.

(suyash tilak new role play devraj in jeevachi hotiya kahili serial on sony marathi)

आता मालिकेत कार्तिक देवराज या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत आहे.

अशा प्रकारची भूमिका सुयशने कधी केली नाही. त्याच्या वेशाची विशेष चर्चा होईल यात शंका नाही. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल.

तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

सुयशच्या नव्या लुक मध्ये तो पूर्ण दाक्षिणात्य पेहरवात आहे. लुंगी, शर्ट, कपाळावर आडवा टिळा, खांद्यावर उपरणे असा त्याचा लुक आहे. ज्यामध्ये तो प्रचंड गोड दिसत आहे. पण तो खलनायकी भूमिका कशी साकारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे आता मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या प्रेमकहाणीमध्ये नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतील यात शंका नाही.

टॅग्स :suyash tilak