सुयश टिळकचा सोशल मीडियाला रामराम! शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं...

स्वाती वेमूल
Tuesday, 2 February 2021

तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियाला रामराम केला.

मुंबई: तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियाला रामराम केला. इन्स्टाग्रामवर कवितेच्या काही ओळी पोस्ट करत त्याने सोशल मीडिया सोडत असल्याचं जाहीर केलं. मात्र यामागचं नेमकं कारण त्याने अद्याप स्पष्ट केलं नाही. 

'फिरा पण कोणाला सांगू नका, खरी प्रेमकहाणी जगा पण कोणाला सांगू नका, खूश राहा पण कोणाला सांगू नका, लोकं सुंदर गोष्टींना उध्वस्त करतात', अशा आशयाच्या ओळी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. याविषयी 'ईसकाळ'शी बोलताना सुयश म्हणाला, "सध्या मी यामागचं कारण सांगू शकत नाही. पण थोड्या वेळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. भविष्यात इच्छा झाल्यास मी पुन्हा सक्रीय होईन."

सुयशने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'खाली पिली' या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ शकला नव्हता. इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

याआधीही अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया सोडण्याचा किंवा थोड्या वेळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच लग्नबंधनात अडकलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने काही महिन्यांपूर्वी ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर वाढतं ट्रोलिंगचं प्रमाण आणि नकारात्मक चर्चा यांमुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर अभिनेता सुबोध भावेनंही ट्विटर अकाऊंट डिलिट केलं आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

suyash tilak says goodbye to social media in a poetic way


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suyash tilak says goodbye to social media in a poetic way