Swanandi Tikekar marathi actress revealed her boyfriend ashish kulkarni, who is her future husband? know details
Swanandi Tikekar marathi actress revealed her boyfriend ashish kulkarni, who is her future husband? know details SAKAL

Swanandi Tikekar Boyfriend: स्वानंदी टिकेकर झाली आनंदी! गोड बातमी दिली, कोण आहे तो?

स्वानंदीने सोशल मिडीयावर तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय.

Swanandi Tikekar Boyfriend News: स्वानंदी टिकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. स्वानंदीला आपण अनेक मालिका आणि सिनेमांंमध्ये अभिनय करताना पाहीलंय. स्वानंदीने सोशल मिडीयावर सक्रीय असते.

बुधवारी सकाळी स्वानंदीने सोशल मिडीयावर तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय. स्वानंदीने अचानक ही गुड न्युज दिल्याने तिच्या फॅन्सला आनंद झालाय. कोण आहे स्वानंदीचा बॉयफ्रेंड? जाणुन घ्या

(Swanandi Tikekar revealed her Boyfriend)

Swanandi Tikekar marathi actress revealed her boyfriend ashish kulkarni, who is her future husband? know details
Khalapur landslide: 'कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं', इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

कोण आहे स्वानंदीचा बॉयफ्रेंड?

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. This is US! असं लिहून #आमचं ठरलंय असा हॅशटॅग स्वानंदीने वापरलाय. आशीष कुलकर्णी हा संगीतकार आहे.

आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करत असतो. आशिष आणि स्वानंदी हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याने त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदी आणि आशिष गेल्या अनेक महिन्यांपासुन एकमेकांना डेट करत आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वानंदी आणि आशिष दोघांनी मात्र आजवर याचा खुलासा केला नाही.

आज अचानक दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केलाय, त्यामुळे त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय.

आशिष आणि स्वानंदीमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे, दोघांनाही गाण्याची आवड आहे. स्वानंदी सोनी मराठीवरील सिंगींग स्टार या रिअॅलीटी शोमध्ये सहभागी होती.

तिने या शोच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं होतं. आशिष सुद्धा इंडीयन आयडॉल 12 मध्ये सहभागी होता. म्युझिकमुळे या दोघांच्या प्रेमाचा धागा जोडला गेला, अशी शक्यता नाकारता येत नाही.

मराठी कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी स्वानंदीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. नम्रता संभेराव, ईशा केसकर, नचिकेत लेले, राहुल देशपांडे, रसिका सुनील,गौतमी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी स्वानंदीला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्यात.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. स्वानंदी अलीकडेच अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? या मराठी मालिकेत झळकली. या मालिकेने काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता स्वानंदी आणि आशिष लग्नबंधनात कधी अडकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com