'स्वरानं पुन्हा लग्नपत्रिका छापली, आता...!' घेतला मोठा निर्णय|Swara Bhaskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar Bollywood actress new wedding card

Swara Bhaskar : 'स्वरानं पुन्हा लग्नपत्रिका छापली, आता...!' घेतला मोठा निर्णय

Swara Bhaskar bollywood actress new wedding : बॉलीवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.काही दिवसांपूर्वी तर तिच्या मधुचंद्राचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आला होता.त्यावर स्वरानं देखील प्रतिक्रिया दिली होती. आता स्वरानं पुन्हा लग्नपत्रिका छापल्याचे दिसून आले आहे.

स्वरानं नव्यानं जी लग्नपत्रिका छापली आहे त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यासगळ्यात स्वरानं आपल्या त्या नव्यानं व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेवरुन केलेली कमेंट चाहत्यांना आवडली आहे. स्वरानं इन्कलाब जिंदाबाद असे लिहून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच टोकले आहे. स्वरानं गेल्या महिन्यात १६ तारखेला कोर्ट मॅरेज केले होते.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

तिनं तिचा बॉयफ्रेंड फहद अहमद याच्यासोबत लग्न केले असून त्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. स्वरा आठवडाभर त्या लग्नामुळे चर्चेत आली होती. स्वराचा प्रेमविवाह असून तिनं केलेला आंतरधर्मीय विवाह हा अनेकांसाठी चर्चेचा विषय होता. त्या लग्नाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो नेटकऱ्यांच्या कौतूकाचा आणि प्रतिक्रियेचा विषय होता. आता पुन्हा स्वरानं लग्नपत्रिका छापली असून मोठा निर्णय घेतला आहे.

स्वरानं नव्यानं लग्नपत्रिका छापून पुन्हा हिंदू धर्मानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर स्वरानं एक खास मेसेज देखील लिहिला आहे. ज्याची चर्चा होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये स्वराच्या लग्नाला सुरुवात होणार आहे. तिच्या कुटूंबातील निवडक व्यक्ती आणि खास मित्र मंडळींच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

१५ ते १६ मार्च दरम्यान हा विवाह सोहळा पार पडणार असून त्याला काही सेलिब्रेटी देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.११ मार्च पासून स्वराचे प्री वेडिंग प्रोग्रॅम सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.