Swara Bhaskar: झाडांची सावली अन् नव्या पाहुण्याची चाहूल; स्वरा भास्करने बेबी बंप दाखवत केलं खास फोटोशूट

स्वरा भास्करने सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलंय
swara bhaskar pregnancy baby bump photoshoot going viral on internet fahad ahmad
swara bhaskar pregnancy baby bump photoshoot going viral on internet fahad ahmadSAKAL

Swara Bhaskar News: स्वरा भास्करने बॉलिवूडमधील चर्चेतली अभिनेत्री. 'गुजारिश', 'रांझना', 'तनु वेड्स मनू' आणि 'वीरे दी वेडिंग' अशा सिनेमांच्या माध्यमातुन बॉलिवूडमध्ये नाव कमावलंय.

स्वराने काही महिन्यांपुर्वी राजकारणी फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. याशिवाय काहीच दिवसांपुर्वी स्वराने सोशल मिडीयावर ती गरोदर असल्याची गुड न्यूज दिली. स्वरा भास्करने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

(swara bhaskar pregnancy baby bump photoshoot going viral on internet fahad ahmad)

swara bhaskar pregnancy baby bump photoshoot going viral on internet fahad ahmad
Subhedar: एकीकडे सुभेदार सुपरहिट, दुसरीकडे नवीन घरात प्रवेश, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात दुग्धशर्करा योग

स्वराचं फोटोशूट व्हायरल

अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या मातृत्व फोटोशूटमधील काही जबरदस्त छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली. यामध्ये ती फहादसोबत एका सुंदर लोकेशनमध्ये दिसतेय. यात स्वराने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रंगीत तसेच मोनोक्रोम फोटो होते.

स्वराने या फोटोला कॅप्शन दिलंय की, "कधीकधी आयुष्य तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुम्हाला आत्म-शोध आणि एकत्रतेच्या प्रवासात घेऊन जाते. आपल्या आयुष्यातील हा खास काळ अगदी सहज, प्रामाणिकपणे आणि आरामात टिपला गेला आहे."

स्वराच्या लग्नावर टिका तरीही स्वराने केले दुर्लक्ष

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वराच्‍या लग्‍नानंतर लोकांनी तिला लग्‍नासाठी खूप शुभेच्छा दिल्या, पण दुसरीकडे अभिनेत्रीला ट्रोल करण्‍याचे प्रमाणही खूप वाढले.

परंतु सर्वांकडे दुर्लक्ष करून स्वराने तिचा सुखाचा संसार केला. आता लग्नाच्या साडेतीन महिन्यानंतर स्वरा आणि फहादच्या आयुष्यात ही गुड न्यूज आल्याने दोघेही खुश आहेत.

या महिन्यात स्वरा होणार आई

आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी शेअर करताना स्वरा भास्करने फोटो पोस्ट करून ट्विटमध्ये लिहिले की, “कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकत्र ऐकली जाते.

या संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे." असं लिहून 'कमिंग सून'. 'कुटुंब, 'ऑक्टोबर बेबी',

अशी पोस्ट करून स्वराने हि आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय. यावरून स्वरा भास्करच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं समजतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com