Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhasker

Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

Swara Bhasker: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आता तिच्या एका जोकमुळेच ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. स्वरानं सोशल मीडियावर ती पोस्ट शेयर करुन स्वताच्याच पायावर धोंडा मारुन घेतला आहे. असे नेटकऱ्यांनी तिला म्हटले आहे. आपल्या आक्रमक आणि परखड स्वभावासाठी स्वरा ही नेहमीच ओळखली जाते. आताही ती चर्चेत आली आहे.

काहीही न करता चर्चेत कसं राहायचं हे स्वराला चांगलं जमलं आहे. कंगना आणि स्वरा या बॉलीवूडच्या अशा अभिनेत्री आहेत की ज्यांना कायम चर्चेत राहणं आवडतं. कारण कोणतंही असो त्यावर प्रतिक्रिया देणं आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणे हे त्यांना साधले आहे. स्वरा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. त्याचे कारण तिनं एका नॉन व्हेज जोकचे केलेले समर्थन. आणि त्यावरुन दिलेली प्रतिक्रिया. स्वरानं हेअर ब्लो हातात धरुन शेयर केलेला फोटो वादाचे कारण ठरत आहे.

सोशल मीडियावर आपली भूमिका ठामपणे मांडण्यात स्वराचा हात कुणीही धरु शकत नाही. त्यामुळे ती जास्त लोकप्रियता मिळवताना दिसते. स्वरानं आपला परखडपणा तिच्या चित्रपटांमधून देखील दाखवून दिला आहे. तिच्या अनारकली ऑफ आरा, तनु वेड्स मनु, वीरे दे वेडिंग सारख्या चित्रपटांतून स्वराचं व्यक्तिमत्व कसं आहे याची झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. यामुळेच की काय स्वरा तिच्यातील बोल्डनेस नेहमीच सोशल मीडियावर शेयर करताना दिसते.

हेही वाचा: Swara Bhaskar: राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला बॉलिवूड अभिनेत्रीचा पाठिंबा

त्याचं झालं असं की, स्वरानं माचो मॅन वरुन दिलेली प्रतिक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते आहे. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. स्वरानं तिच्या ट्विटर अकाउंट वरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तिच्या हातात हेअर कर्लर आहे. आणि त्यावरुन तिनं एक शेलकी टिप्पणी केली आहे. तिची ती प्रतिक्रिया वाचून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. स्वरा तुझ्याकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. असे एकानं म्हटले आहे.

हेही वाचा: Swara Bhasker : स्वराच्या दिवाळी लेहंग्याने वेधल चाहत्यांच लक्ष