Swara Fahad Ahemad Wedding : 'अल्लानं सांगितलं अशा लग्नाला परवानगी नाही! स्वराच्या लग्नावरुन 'नवा फतवा'
Swara Fahad Ahemad Wedding : अभिनेत्री स्वराचं लग्न झालं खरं पण त्यावरुन आता सोशल मीडियावर वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. तिनं आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. यात काहींनी तर मुस्लिम धर्मातील कुराण ग्रंथातील काही वचनांचा आधार स्वरानं केलेलं लग्न हे कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वरानं काय केलं आणि त्याचा वाद झाला नाही असे होणार नाही. त्याशिवाय ती चर्चेत येणार तरी कशी हा प्रश्न आहे.कोणताही गाजावाजा न करता स्वरा समाजवादी पार्टीचा युवा नेता फहद अमहदशी विवाहबद्ध झाली. तिनं कुणालाही न सांगता गुपचूप केलेल्या या लग्नाची अगोदर काहीच कल्पना नव्हती. मात्र स्वरानं ट्विटरवर शेयर केलेल्या फोटोंनी आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
सोशल मीडियावर स्वरा आता वेगळ्याच कारणासाठी ट्रोल होताना दिसते आहे. याचे कारण तिचं फहादशी लग्न करणे हे आहे. त्यात डॉ. यासीर नदीम अल वाजदी यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्यांनी स्वरानं केलेलं लग्न हे इस्लाममध्ये कशाप्रकारे वैध नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी कुराणमधील काही दाखले दिले आहे. त्यांचे ते व्टिट प्रचंड व्हायरल होत असून त्यावरुन काहींनी स्वराला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
डॉ.यासीर यांच्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वरा ही काही मुस्लिम नाही. आणि जर तिचा पती हा मुस्लिम असेल तर ते लग्न वैध नाही. अल्लाहनं म्हटले आहे की, बहुदेववादी अर्थात एकापेक्षा जास्त देवांची पूजा करणाऱ्या महिलेसोबत लग्न हे आपल्या धर्मात वैध नाही. जोपर्यत ती महिला त्या देवांवर श्रद्धा ठेवत असेल अथवा त्यांची पूजा करत असेल. याशिवाय त्या महिलेनं लग्नाच्यावेळी इस्लाम स्विकारण्याविषयी शपथ घेतली असेल तरीही ते लग्न ग्राह्य नाही. असेही यासीर यांनी म्हटले आहे.
या ट्विटनंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. आता कुठे लग्न झालं नाहीतर स्वराच्या विरोधात फतवाही निघाला. त्यांना जरा लग्नाचे दिवस आनंदानं व्यतीत तर करु द्या.अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.