Randeep Hooda Movie : 'टाईम्स स्क्वेअर' वर झळकला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा व्हिडिओ!

टाईम्स स्क्वेअरवर (Randeep Hooda Movie ) व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओेनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar Movie
Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar Movie esakal

Randeep Hooda News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बायोपिक आणि त्याच्याशी संबंधित घडामोडी या सध्या चर्चेत असल्याचे (Swatantrya Veer Savarkar Movie) दिसून आले आहे. प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटामध्ये विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. त्यानं आता शेयर केलेल्या व्हिडिओची चर्चा होत आहे.

यापूर्वी रणदीपनं सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्तानं शेयर केलेल्या इंस्टा (Randeep Hooda Latest News) पोस्टची चर्चा होत होती. त्यात त्यानं अंदमान सेल्युलर जेलमधील काही फोटो पोस्ट केले होते. ज्या तुरुंगात सावरकर इतक्या वर्ष होते त्या जेलमध्ये मी काही मिनिटं देखील राहू शकत नाही. अशा शब्दांत रणदीपनं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणदीपनं सावरकरांच्या बायोपिकसाठी घेतलेली मेहनत, त्यासाठी त्यानं केलेलं वाचन आणि चिंतन याविषयी अनेक पोस्ट अन् बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्यात आता टाईम्स स्क्वेअरमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात रणदीप हुडाच्या सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ दिसून येत आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या भारतीयांनी जल्लोष रणदीपच्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत.

येत्या २२ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. रणदीपच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यामध्ये अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

रणदीपनं जेव्हा त्याच्या नव्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला होता तो पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते. त्यातील त्याची भूमिका, त्याची देहबोली, वेशभूषा या साऱ्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकची प्रेक्षक (Swatantrya Veer Savarkar) आतूरतेनं वाट पाहत असून त्यातील रणदीपच्या भूमिकेची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com