esakal | भूषण कुमारांवरील बलात्काराच्या आरोपावर टी-सीरिजचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

bhushan kumar

भूषण कुमारांवरील बलात्काराच्या आरोपावर टी-सीरिजचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गीतकार गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सीरिज T Series कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार Bhushan Kumar यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. टी सीरिजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप ३० वर्षीय पीडितेने केला आहे. याप्रकरणी टी सीरिजकडून त्यांची बाजू मांडण्यात आली असून संबंधित महिलेचे आरोप हे खोटे आणि तथ्यहीन असल्याचं त्यांनी म्हटलंय. (T-Series issues statement after head Bhushan Kumar is booked for rape slv92)

टी-सीरिजचं स्पष्टीकरण-

'भूषण कुमार यांच्याविरोधात केलेली तक्रार ही पूर्णपणे खोटी आणि द्वेषपूर्ण भावनेतून केली असून त्यातील आरोप फेटाळत आहोत. काम देण्याचे आमिष दाखवून २०१७ ते २०२० या कालावधीत संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप चुकीचा आहे. संबंधित महिलेने टी सीरिज बॅनरअंतर्गत चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओसाठी यापूर्वी काम केले आहे.'

'मार्च २०२१ मध्ये संबंधित महिलेने तिच्या एका वेब सीरिजच्या निर्मितीसाठी भूषण कुमार यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. ही मदत करण्यास भूषण कुमार यांनी नम्रपणे नकार दिला. त्यानंतर लॉकडाउन उठविल्यानंतर जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्या महिलेनं साथीदारासोबत मिळून खंडणीची मागणी केली. याविरोधात १ जुलै २०२१ रोजी टी सीरिज बॅनरकडून अंबोली पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली. आमच्याकडे खंडणी मागितल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग असून पुढील तपासासाठी ते पोलिसांना पुरविण्यात येतील. संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दाखल केल्याच्या रागात तिने भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आम्ही वकिलांशी सल्लामसलत करून योग्य ती कारवाई करू', असं स्पष्टीकरण टी-सीरिजकडून देण्यात आलं आहे.

पीडित महिलेचे आरोप

पीडित महिलेने भूषण कुमार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. भूषण कुमार हे गेली तीन वर्षे त्या महिलेवर अत्याचार करत असल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. काम देण्याच्या नावाखाली २०१७ ते २०२० असे सुमारे तीन वर्षे या मुलीवर कुमार हे अत्याचार करत होते असा आरोप त्या महिलेने केला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अत्याचार केला असल्याचे पीडितेने नमूद केले आहे. तसेच, पीडितेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात येत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

loading image