तापसी पन्नूने दिली तिच्या प्रेमाची कबुली !

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

नुकतचं तापसीने तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. प्रथमचं ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने दमदार अभिनयासह 'बी' टाउनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला इंडस्ट्रिमध्ये दबंग म्हणून ओळखलं जातं. तिने साकारलेल्या भूमिका काहीशा तशाच आहेत. चित्रपटाव्यतीरिक्त ती खऱ्या आयुष्यातही तितकीच निर्भिड आहे. तापसी तिची मतं नेहमीच परखडपणे मांडते. सध्या तापसी तिचा आगामी सिनेमा 'थप्पड' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतचं तापसीने तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. प्रथमचं ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलली आहे.

पिंकविलाच्या ‘नो मोर सीक्रेट’ या चॅटशोमध्ये तापसीने तिच्या लवलाईफचा खुलासा केला. तापसीने ती सिंगल नसल्याचं सांगिंतलं आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, " माझं लग्न झालेलं नाही. पण मी सिंगलही नाही. माझे काही हितचिंतक आणि जवळच्या लोकांना याची कल्पना आहे. माझ्या आयुष्यातील 'ती' व्यक्ती अभिनेता नाही किंवा क्रिकेटरही नाही. त्याच्या जवळपास फिरकणारही नाही."

मात्र तिच्या जोडीदाराचं नाव किंवा त्याच्या कामाविषयी कोणतीही माहिती सांगितली नाही. या चॅट शोमध्ये तापसीसोबत तिची बहिण शगुन पन्नू देखील सामिल होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तापसी लग्नाविषयीही बोलली. मला जेव्हा मुल हवं असेल तेव्हाच लग्न करण्याचा निर्णय घेईन. माझ्या मोजक्या जवळच्या लोकांच्या साक्षीने अगदी एका दिवसात मला लग्न करायला आवडेल. माझं लग्न साध्या पद्धतीने पार पडेल, असे ती म्हणाली. 

तापसीचे सांड की ऑंंख, रश्मी रॉकेट, थप्पड हे काही आगामी चित्रपच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taapsee Pannu admits she is in a Romantic Relationship