तापसीने स्वतः मालदिवच्या बीचवरचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. बिकीनीमधील तापसी पन्नूचे हॉट फोटो एकदम ट्रेंडिंग झाले आहेत. समुद्रकिनाऱ्या वरच्या या फोटोंना तापसीने 'राईस ऍन्ड शाईन लिटरली' असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो तापसीची बहिण शगुन पन्नूने काढले आहेत.
मुंबई-तापसी पन्नू सध्या मालदिवमध्ये मस्त एन्जॉय करतेय. तिच्याबरोबर तिची बहिण शगुन, चुलत बहिण इव्हानिया आणि बॉयफ्रेंड मिथियास बो हे देखील आहेत. या सर्वांनी मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या मौजमजेचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हायला लागले आहेत.
तापसीने स्वतः मालदिवच्या बीचवरचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. बिकीनीमधील तापसी पन्नूचे हॉट फोटो एकदम ट्रेंडिंग झाले आहेत. समुद्रकिनाऱ्या वरच्या या फोटोंना तापसीने 'राईस ऍन्ड शाईन लिटरली' असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो तापसीची बहिण शगुन पन्नूने काढले आहेत.
तिचे क्रेडिट देताना तापसीने 'आमची नवी डिरेक्टर' अशी ओळख करून दिली आहे. त्यांच्या दंगा मस्तीबरोबरच मध्येच तिचा बॉयफ्रेंड मिथियस बो याचेही फोटो दिसत आहेत. तापसीने त्याच्याबाबत मात्र आपल्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये विशेष माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या या ट्रीप बाबत सांगितले होते.
आता तिच्या या ट्रीपचे तपशील पुढे येत आहेत. आणखीन काही दिवस तरी ती मालदिवला एन्जॉय करणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे कुठेही बाहेर जायची संधी न मिळाल्याने आता सगळी कसर तापसी यानिमित्ताने भरून काढतेय.