'..आणि मग ते म्हणतात आमचं बॉलीवूड...', तापसी पन्नूचं विकास दुबे एनकाउंटवर ट्विट

taapsee pannu
taapsee pannu

मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. सिनेमांव्यतिरिक्त तापसी सोशल मिडीयावर आपलं मत स्पष्ट आणि परखडपणे मांडण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. यावेळी देखील अशाच एका ताज्या प्रकरणावर तापसीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. गँगस्टर विकास दुबे एनकाउंटवर प्रकरणावर तिने ट्विट केलं आहे.

गँगस्टर विकास दुबेवर अनेक लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनीच त्याच्यावर प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. सगळ्यांची एकच मागणी होती की त्याला मारलं जावं. आता जेव्हा विकासचं एनकाउंटर करण्यात आलंय तेव्हा देखील अनेकांनी यावर त्यांचं स्पष्ट मत मांडलंय.

अभिनेत्री तापसी पन्नूने देखील तिची प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे. तापसीने म्हटलंय, 'वाह याची तर अजिबातंच अपेक्षा नव्हती. आणि मग ते म्हणतात की आमच्या बॉलीवूडच्या कथा वास्तवतेपासून लांब असतात. '  तापसीने तिच्या या प्रतिक्रियेमधून त्या लोकांवर निशाणा साधला आहे जे लोक नेहमी बॉलीवूडच्या कथांमध्ये खरेपणा नसतो असं म्हणतात.

गँगस्टर विकास दुबेने ८ पोलिसांची कानपूरमध्ये हत्या केली होती आणि तो फरार होता. त्याला ९ जुलै रोजी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या परिसरातून अटक करण्यात आली. त्याला कानपूरला आणलं जात होतं मात्र रस्त्यातंच गाडीचा अपघात होऊन गाडी उलटी झाली. या दरम्यान त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता क्रॉस फायरिंगमध्ये त्याचं एनकाउंटर करण्यात आलं.

तापसी पन्नू गेल्या काही दिवसांमध्ये तीच्या वीजबीलामुळे चर्चेत आली होती. तिचं जून महिन्याचं बील अचानक १० पटीेने वाढून ३६ हजार इतकं आलं होतं. तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तापसी आगामी अनेक चांगल्या प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे.  'हसीन दिलरुबा' या थ्रिलर सिनेमात दिसेल. याशिवाय 'रश्मि जॅकेट' या मिताली राजच्या बायोपिकमध्येही काम करत असल्याचं कळतंय.  

taapsee pannu reaction on kanpur gangster vikas dubey encounter  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com