धार्मिक कट्टरतेला फटकारणारा 'मुल्क'; ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

धार्मिक कट्टरता, दहशतवाद आणि हिंदू-मुस्लिम वाद यांवर प्रश्न करणारा हा सिनेमा आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये सध्या चमकत आहे. 'बेबी', 'नाम शबाना', 'पिंक' यासारख्या हिट्स नंतर तापसी पुन्हा एकदा नवीन सिनेमासह सज्ज झाली आहे. तिचा 'मुल्क' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी सोबतच या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर देखील मुख्य भुमिकेत आहेत. 

नुकताच 'मुल्क'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रजत कपूर, आशूतोष राणा, नीना गुप्ता, प्रतिक बब्बर यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. धार्मिक कट्टरता, दहशतवाद आणि हिंदू-मुस्लिम वाद यांवर प्रश्न करणारा हा सिनेमा आहे. काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं. ही मानसिकता समाज आरोग्यासाठी किती घातक ठरते हे सिनेमातून दाखवून देण्यात आले आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'मुल्क' येत्या 3 ऑगस्टला प्रदर्शित होईल. 

सिनेमाविषयी तापसी म्हणाली, 'माझा मॅनेजर, माझा ड्रायव्हर आणि घरात काम करणारी लोक ही धर्माने मुस्लिम आहे. पण या लोकांमुळेच माझं आयुष्य व्यवस्थित सुरु आहे. ही लोक माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कुणा एका धर्माला टार्गेट करणे ही बाब चुकीची आहे.'
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taapsee Pannu Starer Mulk Official Trailer Launch