esakal | 'तुम्ही एका ट्विटमुळे डगमगत असाल तर..'; तापसी पन्नूचा सणसणीत टोला

बोलून बातमी शोधा

taapsee pannu}

राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता ट्विटरवर दोन गट तयार झाले आहेत.

'तुम्ही एका ट्विटमुळे डगमगत असाल तर..'; तापसी पन्नूचा सणसणीत टोला
sakal_logo
By
स्वाती वेमूल

राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता ट्विटरवर दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे एकी राखा असं भारतीयांना आवाहन करणारे दोन गट ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप सिंग रिहानापाठोपाठ पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी ट्विट केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. तर या सेलिब्रिटींच्या विरोधात देशातील अभिनेते मैदानात उतरले. या सर्व प्रकरणावर आता अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करत इतर अभिनेत्यांना सणसणीत टोला लगावला आहे. 

'जर एका ट्विटमुळे तुमच्या एकतेला धक्का पोहोचत असेल, एका मस्करीमुळे तुमच्या विश्वासाला तडा जात असेल किंवा एका शोमुळे तुमच्या धार्मिक श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर इतरांसाठी प्रचाराचे शिक्षक होण्याआधी तुम्हाला तुमची मूल्यव्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे', अशा शब्दांत तापसीने टोला लगावला. 

अभिनेत्री कंगना राणावत, अक्षय कुमार, अजय देवगण, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांनी ट्विटच्या माध्यमातून ग्लोबल सेलिब्रिटींना प्रत्युत्तर दिलं होतं. #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या ट्रेंडच्या माध्यमातून ट्विटरवर सेलिब्रिटींच्या ट्विट्सची मालिका सुरू झाली होता.