taarak mehta ka ooltah chashma fame Monika Bhadoriya slams bagha actor tanmay vekaria
taarak mehta ka ooltah chashma fame Monika Bhadoriya slams bagha actor tanmay vekariaSAKAL

Monika Bhadoriya: "तो अत्यंत वाईट...", बावरी साकरणाऱ्या अभिनेत्रीचा 'या' सहकलाकारावर गंभीर आरोप

तारक मेहता...चष्मामधील बावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सहकलाकारवर गंभीर आरोप केले आहेत
Published on

Monika Bhadoriya News: भारतीय टेलिव्हिजनमधील लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. तारक मेहता...चष्मा मालिका गेली १० पेक्षा जास्त वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

तारक मेहता...चष्मा अजुनही लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरीही मालिकेतले अनेक जुने कलाकार मालिका सोडून गेले आहेत. अशातच तारक मेहता...चष्मा मध्ये बावरीची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेतल्या सहकलाकारावर गंभीर आरोप केले आहेत.

taarak mehta ka ooltah chashma fame Monika Bhadoriya slams bagha actor tanmay vekaria
Devara Teaser: रक्तात मिसळलेला 'लाल समुद्र' अन् तो... Jr. NTR च्या देवराचा थरारक टीझर बघाच!

तारक मेहता...चष्मा मधील निर्माते असित कुमार मोदी हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याआधी, अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल जिने तारक मेहता...चष्मामध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारली होती, तिने निर्मात्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.

नंतर अभिनेत्रीने शो सोडला आणि तिची भूमिका सध्या मोनाझ मेवावालाला देण्यात आली. आता शोमध्ये बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सहकलाकार बाघा म्हणजेच अभिनेता तन्मय वेकारियावर गंभीर आरोप केले आहेत.

तन्मय चांगला सहकलाकार नाही: मोनिका भदोरिया

TMKOC ची अभिनेत्री मोनिकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. जिथे ती तिचा सहकलाकार तन्मय वेकारिया जो बाघाची भूमिका साकारत आहे, त्याच्यावर गंभीर आरोप केलाय.

व्हिडीओमध्ये मोनिकाने तन्मय हा एक चांगला अभिनेता असला तरी चांगला सहकलाकार नसल्याबद्दल सांगितले. तिने पुढे सांगितले की तो, असितच्या अत्यंत जवळचा आहे आणि जेव्हा वाद वाढला तेव्हा तन्मयने असितला साथ दिली.

तन्मयबद्दल बोलताना, मोनिकाने हे देखील उघड केले की, तो खूप गर्विष्ठ व्यक्ती आहे आणि अनेकदा असित मोदींची बाजू घेतो. तन्मय एक 'वाईट सहकलाकार' आहे. तन्मयच्या स्वभावामुळे तिने अनेकदा त्याच्यासोबत फक्त कामापुरती संबंध ठेवला. मोनिका गेल्यानंतर आता नवीन बावरी म्हणून नवीन वाडेकर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com