अरबी गाण्यावर थिरकली तारक मेहताची 'बबीता जी'; चाहते झाले फिदा

या डान्सवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
अरबी गाण्यावर थिरकली तारक मेहताची 'बबीता जी'; चाहते झाले फिदा

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) मधील बबिता जी (Babita Ji) अर्थात मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही तिच्या अभिनयाने तर प्रसिध्द आहेच शिवाय सोशल मीडिवरही ती नेहमीच हटके व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या पसंदीस ती उतरते. याआधी गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील ढोलिडा गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ मुनमुनने शेअर केला होता. त्यानंतर आता तिने बेली गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या डान्सवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

मुनमुनचा अरबी गाण्यावर डान्स केलेला व्हिडीओ चाहत्यांनी खूपच आवडला आहे. ती नेहमीच मनोरंजन करते. मुनमुनने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहेच शिवाय डान्स स्टेप्स ही खुपच सुंदर आहेत. तिचे हावभावही पाहण्यासारखे आहेत. यामुळे तिचा हा व्हिडिओ शेअर केलेल्या काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही चाहत्यांनी तिला दाद दिली आहे,तर काहींनी याला गदर म्हटले आहे. काहींनी तिच्या घराची स्तुति केली आहे.

Summary

मुनमुनने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहेच शिवाय डान्स स्टेप्स ही खुपच सुंदर आहेत.

मुनमुन दत्ता गेल्या १३ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करत आहे. याआधी तिने अनेक शोमध्ये काम केले आहे. मात्र तिची खरी ओळख या लोकप्रिय कॉमेडी शोमुळेच मिळाली. अनेकवेळा तिने शो सोडल्याचे व्हायरल झाले होते. पण बबिता जीचे हे पात्र आजही लोकांना आवडते आणि कदाचित त्यामुळेच ती या शोमध्ये काम करताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com