'तारक मेहता..'मधील 'सोनू'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी | Palak Sindhwani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

palak sindhwani

'तारक मेहता..'मधील 'सोनू'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या लोकप्रिय मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकतंच स्वत:चं नवीन घर विकत घेतलं. त्यानंतर आता या मालिकेतील आणखी एका व्यक्तीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानी Palak Sindhwani हिने नुकतंच हक्काचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या २३व्या वर्षी तिने हे घर विकत घेतल्याने चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पलकने सोशल मीडियावर तिच्या नव्या घरातील फोटो पोस्ट केला आहे. 'घरासारखी दुसरी कुठलीच जागा खास नाही, असं म्हणतात. मी नुकतंच माझ्या नवीन घरात राहायला आले,' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. चाहत्यांसोबत सेलिब्रिटीसुद्धा पलकला शुभेच्छा देत आहेत. या फोटोमध्ये तिने तिच्या लिव्हिंग रुममधील आलिशान फर्निचरची झलक दाखवली आहे. पलकचं हे नवीन घर आणि त्याचं इंटेरिअर चाहत्यांना खूपच आवडलं आहे.

हेही वाचा: 'दयाबेन'ची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी पतीला केलं ट्रोल

गेल्या काही वर्षांपासून पलक 'तारक मेहता..' या मालिकेत सोनूची भूमिका साकारत आहे. याआधी झील मेहता आणि निधी भानुशाली यांनी मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. पलकने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. 'तारक मेहता..'मधील सोनूच्या भूमिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.

loading image
go to top