तारक मेहताच्या जेठालालच्या घरी 'गुड न्यूज', पण...

तारक मेहता का उल्टा चष्माची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
तारक मेहताच्या जेठालालच्या घरी 'गुड न्यूज', पण...

तारक मेहता का उल्टा चष्माची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता या मालिकेतील कलाकारांचे प्रेक्षकांशी एक भावनिक नाते तयार झाले होते. त्या कलाकांरांना सोशल मीडियावर फॉलो करणं, त्यांचे अपडेट्स ठेवणं हे चाहत्यांना आवडते. सध्या या मालिकेतील प्रमुख कलाकार जेठालाल यांच्या घरी गुड न्युज आहे. गेल्या 13 वर्षांपासून तारक मेहता या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दिलीप जोशी यांना तारक मेहतामध्ये जेठालालचे भूमिका केली आहे.

दिलीप जोशी यांच्या घरात सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. त्यानिमित्तानं ते व्यस्त आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न या महिन्यामध्ये पार पडणार आहे. जोशी यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं ऋत्विक जोशी नियती जोशी अशी आहेत. नियतीचा विवाहसोहळा आता पार पडणार आहे. त्यानिमित्तानं जेठालाल यांनी सगळीकडे निमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे. त्यांचा होणारा जावई हा परदेशात एका कंपनीमध्ये काम करतो. 11 डिसेंबरला हे लग्न होणार आहे. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्या लग्नाला त्यांचे इतर सर्व सहकारी उपस्थित राहणार आहे.

या लग्नाला दिलीप जोशी यांच्यासमवेत काम करणाऱ्या दयाबेन अर्थात दिशा वकानी या लग्नसमारंभाला येऊ शकणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वास्तविक दिशा वकानी आणि दिलीप जोशी यांच्यात चांगले बॉडिंग आहे. मात्र त्यांनी या लग्नाला येण्यास नकार दिला आहे. लग्नासाठी त्यांनी आपल्या शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची चर्चा आहे. त्यामुळे या लग्नाला दिशा वकानी उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र अद्याप त्या दोघांकडून त्यावर कुठल्य़ाही प्रकारची टिप्पणी करण्यात आली आहे.

तारक मेहताच्या जेठालालच्या घरी 'गुड न्यूज', पण...
'उच्च जातीतल्या' लोकांच्या पंगतीत जेवला म्हणून एकाची हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com