चाहत्यांना 'वसंत गावडे' आवडला, भुवन बाम भाव खावून गेला! | Taaza Khabar Twitter Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taaza Khabar Twitter Review

Taaza Khabar Twitter Review : चाहत्यांना 'वसंत गावडे' आवडला, भुवन बाम भाव खावून गेला!

Taaza Khabar Twitter Review Bhuvan Bam social : ओटीटी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध युट्युबर भुवन बामची पहिली सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी देखील त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. ताजा खबर असे त्या मालिकेचे नाव आहे.

ताजा खबरनं सोशल मीडियावर मोठं वातावरण तयार केलं आहे. ती मालिका प्रदर्शित होताच आपल्या लाडक्या भुवन बामवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ताजा खबरविषयी चाहत्यांना मोठे कुतूहल होते. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलरमधील संवाद चाहत्यांना भावले होते.

Also Read - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

भुवन बाम हा युट्युबविश्वाचा बादशहा आहे. असे म्हटले जाते. त्यानं ओटीटी विश्वावर डेब्युही या मालिकेच्या माध्यमातून केले आहे. ज्यांनी त्याची ताजा खबर नावाची मालिका पाहिली आहे ते भुवनवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्यानं चाहत्यांना आगळं वेगळं सरप्राईज दिलं आहे. भुवनच्या अभिनयाचे कौतूक होताना दिसते आहे. आपल्या पहिल्याच मालिकेमध्ये त्यानं जी दमदार भूमिका साकारली आहे त्याबद्दल चाहत्यांना कौतूक आहे.

खरं तर भुवनची ही मालिका सहा जानेवारीलाच प्रदर्शित होणार होती. मात्र त्यानं ती एक दिवसपूर्वी प्रदर्शित केली आहे. त्याच्या चाहत्यांना मालिकेची खूप उत्सुकता होती. एका युझर्सनं प्रतिक्रिया दिली आहे की, भुवन तू कमाल केली आहे. तुझं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. स्टोरी एकदम कडक आहे. श्रिया पिळगावकरनं मिर्झापूर आणि गिल्टी माईडस नंतर या मालिकेतून दमदार अभिनय केला आहे.

प्रेक्षकांना वसंत गावडे आवडला. भुवननं ही दमदारपणे ही भूमिका साकारली आहे. त्याचा अभिनय, त्याची संवादशैली, हे सारं काही प्रेक्षकांना आवडलं. त्यामुळे त्यांनी भुवनचं तोंडभरून कौतूक केले आहे. आतापर्यत त्याचे तीन एपिसोड व्हायरल झाले असून पुढील भागांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असे सांगितले जात आहे. भुवन आम्हाला तू आवडला. तुझे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.

एका वेगळ्या विषयाची मांडणी ताजा खबरमधून समोर आली आहे. भुवननं त्यातून प्रेक्षकांना काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्याचा पहिलाच प्रयत्न आणि वसंत गावडे लोकांना भावला. हे भुवनचे कौतूक आहे. हे त्याचे यश आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.