तब्बू म्हणतेय अजयमुळे मी अजूनही सिंगल!

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नुकत्याच रिलिज झालेल्या गोलमाल अगेनमुळे अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वारंवार तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. आता तर सलमान आणि तब्बू यांचं लग्न होणार असल्याच्या वावड्याही उडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूने बोलता बोलता आपल्या लग्नाला इतकं का महत्व दिलं जातं असा सवाल केला होता. त्यानंतरच्या मुलाखतीत मात्र तिने आपण आजवर सिंगल असण्याला अजय देवगणला जबाबदार धरलं आहे.

मुंबई : नुकत्याच रिलिज झालेल्या गोलमाल अगेनमुळे अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वारंवार तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. आता तर सलमान आणि तब्बू यांचं लग्न होणार असल्याच्या वावड्याही उडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूने बोलता बोलता आपल्या लग्नाला इतकं का महत्व दिलं जातं असा सवाल केला होता. त्यानंतरच्या मुलाखतीत मात्र तिने आपण आजवर सिंगल असण्याला अजय देवगणला जबाबदार धरलं आहे.

ती म्हणाली, 'अजय देवगण आणि मी लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. म्हणूनच त्याच्या कोणत्याही सिनेमाला मी नाही म्हणत नाही. विजयपथ, हकीकतपासून सुरू झालेला प्रवास आता गोलमाल अगेन पर्यंत आला आहे. अजयला मी कघीच नाही म्हणत नाही. तो सिनेमात असला आणि त्याने मला एखादा रोल आॅफर केला की मी त्यात फिट बसणारी असते.' त्यात कुणी लग्नाबद्दल विचारल्यावर तिने अजयचाच आधार घेतला. ती म्हणाली, 'पूर्वी मी कोणत्याही मुलाला भेटले की अजय आणि माझी भावंडं त्या मुलाला धमकवायची. त्यामुळे कोणी मुलं मला भेटायलाही येत नसत. त्यामुळेच मी आजवर सिंगल राहिले. खरंतर याला जबाबदार अजय आहे'', अर्थात हा गमतीचा भाग आहे. आता तब्बू 45 वर्षांची झाली आहे. आपण आजवर सिंगल का असा प्रश्न कुणी पत्रकाराने तिला विचारला तर मात्र ती सीरीअसली तो प्रश्न टाळते. 

 

Web Title: tabu says she is single ajay devgan esakal news gossip