संध्याचा नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत रोमान्स, 'तो अनुभव म्हणजे...'|Taj Divided By Blood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aj Divided By Blood Web Series Sandhya Mridul Naseeruddin Shah

Taj Divided By Blood : संध्याचा नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत रोमान्स, 'तो अनुभव म्हणजे...'

Taj Divided By Blood Web Serise : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्यांची जात डिव्हायडेड बाय ब्लड नावाची मालिका प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. त्या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान शहा यांनी केलेल्या विधानांचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे.

शहा यांनी मुघल शासकांच्या बाजूनं जे विधान केलं होतं, त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले होते. मुघलांचा एवढा राग असेल तर त्यांनी तयार केलेल्या वास्तू पाडून का टाकत नाहीत. असा सवाल शहा यांनी उपस्थित केला होता. याशिवाय सध्या देशातील परिस्थिती पाहता माझ्या मित्रांना देखील या देशामध्ये राहावसं वाटत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

यासगळ्यात ताज डिव्हायडेड बाय ब्लड मालिकेत नसिरुद्धीन शहा यांच्यासोबत रोमान्स करणाऱ्या संध्या मृदुलची चर्चा होताना दिसते आहे. पेज ३, हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संध्यानं नव्या मालिकेविषयीच्या अनुभवांविषयी सांगितले आहे. तिनं या मालिकेत नसिरुद्धीन शहा यांच्यासोबत बोल्ड सीन दिले आहेत.

माझ्यासाठी शहा यांच्यासोबत इंटिमेट सीन कऱणं ही अवघड गोष्ट होती. संध्यानं या मालिकेमध्ये जोधाबाईची भूमिका साकारली आहे. भूमिका साकारताना नसिरुद्धीन शहा यांची खूप मदत झाली. त्यांनी सांभाळून घेतलं. त्यांचा विनोदी स्वभाव त्यामुळे कोणती अडचण आली नाही. ते तर म्हणायचे अरे देवा ही अभिनेत्री तर खूपच तरुण आहे, संध्या तू म्हातारी केव्हा होणार असे मला गंमतीत म्हणायचे. असं गंमतीशीर वातावरण सेटवर होतं.

माझं नशीब की तिच्याबरोबर माझे फारसे रोमँटिक सीन नाहीत. अशीही प्रतिक्रिया नसिरुद्दीन शहा यांनी दिली होती. ताज डिव्हायडेड बाय ब्लड ही मालिका मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार असून त्यामध्ये धर्मेंद्र, आदिती राव हैदरी, नसिरुद्धीन शहा, संध्या मृदुल यांनी भूमिका साकारल्या आहेत.