
गोव्यातील न्यू इयर पार्टीमध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी किस केल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या रोमान्सच्या बातम्याही चर्चेत आल्या आहेत. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, सेलिब्रिटी कपल पुन्हा एकदा डेटवर जाताना दिसले. यादरम्यान पापाराझींनी त्यांचे फोटोही जोरदार क्लिक केले परंतु दोघांनीही एकत्र पोज दिली नाही.
रिपोर्टनुसार, हे लव्ह बर्ड्स सोमवारी पहिल्यांदाच एकत्र दिसले. तमन्ना आणि विजय वांद्र्याच्या आसपास एकत्र फिरताना दिसले. यादरम्यान तमन्नाने काळ्या रंगाचा हुडी आणि मॅचिंग शॉर्ट स्कर्ट घातला होता, तर विजयने तपकिरी कार्गो पॅंटसह निळ्या रंगाची हुडी घातली होती. रिपोर्टनुसार, दोघे लंच डेटवर गेले होते. दोघांनी कॅमेर्यासाठी एकत्र पोज दिली नाही.
याआधी नुकतेच एका इव्हेंटमध्येही हे लव्हबर्ड्स पाहायला मिळाले होते. येथे त्यांनी पापाराझींसाठी एकत्र पोजही दिली. हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्व बाजूंनी लाईक्स आणि कमेंट्स आल्या. दोघांनी त्यांच्या लिंक-अपबद्दल काहीही बोलले नसले तरी दोघेही 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम करत आहेत.
तमन्ना शेवटची नेटफ्लिक्सच्या 'प्लॅन ए प्लान बी' या चित्रपटात रितेश देशमुखसोबत दिसली होती. नुकतीच ती मधुर भांडारकरच्या 'बबली बाउन्सर'मध्येही दिसली होती. विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' मध्ये दिसणार आहे, जो करीना कपूर खानचा डिजिटल डेब्यू असेल, जयदीप अहलावत देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.