Tamannaah Bhatia: पहिल्यांदाच विजयसोबत तमन्ना देणार किसींग सीन; १८ वर्षांपूर्वीचा नियम मोडला

गेली १८ वर्ष तमन्नाने NO KISS हा नियम पाळला होता. पण आता मात्र तमन्ना या नियमाचा भंग करणार आहे.
Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflix
Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflixSAKAL

Tamannaah Bhatia break no kiss rule News: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या तत्वांवर ठाम असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्ना गेली अनेक वर्ष भारतीय मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

तमन्ना बाहुबली सिनेमातून जगभरात लोकप्रिय झाली. तमन्नाने हिंदी मनोरंजन विश्वात सुद्धा स्वतःची वेगळी ओळख मिळवली.

गेली १८ वर्ष तमन्नाने NO KISS हा नियम पाळला होता. पण आता मात्र तमन्ना या नियमाचा भंग करणार आहे.

(Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflix)

Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflix
Megha Dhade: भाजप जगातला बलशाली पक्ष, पक्षप्रवेशानंतर मेघा धाडेची पहिली प्रतिक्रिया

Netflix वर लवकरच रिलीज होणाऱ्या लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्ना आणि विजय वर्मा एकत्र झळकणार आहेत. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान तमन्ना म्हणाली की, पडद्यावर इंटिमेट सीन्स पाहिल्यानंतर मी असे कधीच करणार नाही असं ठरवलं होतं.

मी पडद्यावर कधीही कोणाला किस करणार नाही. पण तमन्नाने विजय वर्मासाठी तिचा १८ वर्षांचा नियम मोडला. लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्नाची विजय वर्मासोबतची रोमँटिक केमिस्ट्री दिसणार आहे.

Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflix
Rekha: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं टीव्हीवर दमदार कमबॅक, या मालिकेत साकारणार खास भुमिका

सुजॉय घोषसोबत काम करताना तमन्ना खूश आहे. ती म्हणते की, मला नेहमीच सुजॉयसोबत काम करायचे होते आणि या सिनेमासाठी त्याने माझी निवड केली याचा मला खूप आनंद आहे.

माझ्या करिअरच्या इतक्या वर्षात मी कधीही इंटिमेट सीन दिलेले नाहीत किंवा फार कमी इंटिमेट सीन केले आहेत, पण लस्ट स्टोरीमधील कथेच्या मागणीमुळे मला ते करावे लागले.

तमन्ना सध्या विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये ती विजय वर्मासोबत अभिनय करतेय.

विजयच्या प्रेमात तमन्नाने तिचा किस न करण्याचा नियमही मोडला. तमन्नाने याविषयी म्हटले आहे की, तिने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिचा नियम मोडला नाही.

हा पूर्णपणे क्रिएटिव्ह प्रयत्न आहे. आता 18 वर्षांनंतर मी प्रसिद्ध होण्यासाठी हे अजिबात करत नाही आहे.

Tamannaah Bhatia break no kiss rule intimate with vijay verma in lust stories 2 netflix
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस Adipurush पाहणार, रिलीजपूर्वी सिनेमाला शुभेच्छा

लस्ट स्टोरीज 2 बद्दल सांगायचं झालं तर.. अमित रवींद्रनाथ शर्मा, आर. बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष दिग्दर्शित लस्ट स्टोरीज 2 लवकरच OTT Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

अंगद बेदी, काजोल, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोमे आणि विजय वर्मा या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटात एकसे बढकर एक कलाकार आहेत. लस्ट स्टोरीज २ नेटफ्लिक्सवर २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com