Tamannah Bhatia Birthday: हिरोने केलं तर कौतुक अन् मी केलं तर... इंटीमेट सीनवर तमन्नाचं रोखठोक उत्तर

तमन्ना भाटीयाचा आज वाढदिवस
Tamannah Bhatia On Intimate Scenes
Tamannah Bhatia On Intimate ScenesEsakal

Tamannah Bhatia On Intimate Scenes: साउथची लोकप्रिय अभिनेत्रीने जिने केवळ दाक्षिणात्य मनोरंजन विश्वापर्यंतच मर्यादित न राहता आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्येही वेगळ स्थान निर्मण केलं आहे. आज तमन्ना भाटियाचा वाढदिवस.

'बाहूबली' फेम तमन्ना काही दिवसांपुर्वी लस्ट स्टोरीज या तिच्या वेबसिरिजमुळे खुपच चर्चेत आली आहे. तिने 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमध्ये काम केले आणि तिच्या इंटिमेट सीनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ही वेब सिरीज 29 जून रोजी OTT वर रिलीज झाली होती, ज्यामध्ये तमन्ना आणि विजय वर्मा एकत्र दिसत आहे. या सिरिजमध्येही तमन्नाने विजयसोबत अनेक इंटिमेट सीन्स आहेत.

तमन्नाने या सिरिजसाठी तिची नो किंसींग पॉलिसीही तोडली होती. तिच्या या सीनची खुपच चर्चा झाली. रोमँटिक सीनमुळे तिला खुप ट्रोलही करण्यात आले आहे.

Tamannah Bhatia On Intimate Scenes
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Trailer : अब खेला होबे! प्रेम, परिवार अन् युद्ध..रॉकीच्या राणीला हजार प्रश्न मग कसं होणार लव्ह कनेक्शन?

तमन्नाने स्वतः एका मुलाखतीत या सगळ्यावर बोलून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आणि तिला ट्रोल करणाऱ्यांनी चोख उत्तर दिले आहे.

याबद्दल बोलतांना तमन्ना म्हणतो की, लोक तिला ज्या पद्धतीने तिला जज करत आहेत हे पाहिल्यानंतर तिला खुप आश्चर्य वाटले आहे. ती म्हणते की असे सीन जर पुरुष कलाकारांने केले तर त्याचे कौतुक केले जाते. मात्र मुलींना जज करण्यासाठी त्यांना जराही वेळ लागत नाही. 2023 मध्येही लोकांची मानसिकता अशीच आहे.

त्यांनी लगेचच तिला ट्रोल करायला सुरुवात केली. इतकच नाही तर तिला एकानं कमेंट करत विचारल होतं की 'इतका कसला नाईलाज होता की तुला हे काम करावं लागलं', तमन्नाला ही कमेंट मुळीच आवडली नाही ती म्हणते की जर ती सीरियल किलरची भुमिका साकरत असेल तर काय ती लगेच सीरियल किलर होईल का?

Tamannah Bhatia On Intimate Scenes
Ameesha Patel: 'त्यामुळे माझं करिअर उद्ध्वस्त झालं..', विक्रम भट्टच्या रिलेशनशीपवर अमिषा शेवटी बोललीच..

तमन्ना भाटिया वर्कफ्रंट

तमन्ना 'लस्ट स्टोरीज 2' मुळे खूप चर्चेत आहेच मात्र यानंतर तिच्या हातात 'भोला शंकर' आणि 'जेलर' असे दोन बिग साउथ चित्रपट आहेत. भोला शंकर या चित्रपटात तमन्ना, चिरंजीवी आणि कीर्ती सुरेशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर 'जेलर'मध्ये ती रजनीकांतसोबत काम करताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com