esakal | एवढा मोठा अभिनेता, कारचा टॅक्स चूकवला, विजयला कोर्टानं फटकारलं
sakal

बोलून बातमी शोधा

thalapathy vijay

एवढा मोठा अभिनेता, कारचा टॅक्स चूकवला, विजयला कोर्टानं फटकारलं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांमधील एक प्रख्यात अभिनेता (south movie industry) सध्या चर्चेत आला आहे, त्याचे कारण म्हणजे त्यानं आपल्या कारवरील टॅक्स भरला नाही. त्यामुळे त्याला कोर्टानं फटकारल आहे. एवढेच नव्हे तर त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्या अभिनेत्याच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. त्याचे नाव थलापती विजय आहे. ज्या कलाकाराची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे त्यानं कोर्टाची नाराजी ओढावून घेतल्यानं सोशल मीडियावर चर्चा होतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी विजयचा मास्टर (master) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो हिट झाला. ( tamil actor thalapathy vijay fined 1 lakh rupees madras high court seeking tax exemption imported car bhojpuri south yst88)

कारवरील जो टॅक्स वाचवणे विजयला महागात पडले आहे. त्यामुळे त्याला एक लाख रुपयांचा टॅक्स भरावा लागला आहे. मद्रास हायकोर्टानं त्याला त्याच्या इंपोर्टेड कारवरील टॅक्स भरायला सांगितला होता. त्यानंही तो टॅक्स चूकवला होता. विजय हा तमिळ सुपरस्टार आहे. त्याचा चाहतवर्गही मोठा आहे. त्याचे चित्रपटही सर्वांच्या आवडीचे असतात. तो आणि विजय सेतूपती यांच्यात प्रेक्षक कायम तुलना करत असतात. मात्र हे दोन्हीही अभिनेते वेगळ्या क्षमतेचे असल्यानं त्यांच्या भूमिका चर्चेचा विषय असतो.

न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन त्याविरोधात जाण्याचे धाडस केवळ साऊथ मधील अभिनेत्यांनी दाखविले आहे असे नाही. तर बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील कोर्टाचा अवमान केला आहे. सध्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास अभिनेत्री जुही चावलाचे देता येईल. तिनं 5 जीच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्या सुनावणीचे व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं कोर्टानं तिच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा: शेखर बांधून घेणार अरुंधतीकडून राखी; पाहा व्हिडिओ

आता विजयला ((Tamil) मद्रास कोर्टानं (Madras High Court) दणका दिला आहे. त्याला एक लाख रुपये भरण्याचा दंड ठोठावला आहे. याचे कारण त्यानं बाहेर देशातून आयात केलेल्या कारवरील टॅक्स भरलेला नाही. त्याची किंमत त्याला आता चूकवावी लागणार आहे. विजयनं (Vijay) 2012 मध्ये एक कार खरेदी केली होती. हे प्रकरण तेव्हाचे आहे.

loading image