Tamil Actor Vishal : तामिळ अभिनेता विशालचा सेन्सॉर बोर्डावर आरोप

तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने त्याच्या आगामी चित्रपट ‘मार्क अँटनी’ चे हिंदी व्हर्जन उत्तर भारतात प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने 6.5 लाखाची लाच मागितल्याचा आरोप केला.
Tamil Actor Vishal
Tamil Actor Vishalsakal

मुंबई - तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने त्याच्या आगामी चित्रपट ‘मार्क अँटनी’ चे हिंदी व्हर्जन उत्तर भारतात प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने 6.5 लाखाची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. ह्या माहितीचा व्हिडीओ त्याने काल सोशल मीडियावर टाकताच, तो व्हिडीओ वायरल झाला आणि आज सर्वत्र खळबळ उडाली.

यामुळे या व्हिडीओची दखल ‘माहिती आणि प्रसारण’ मंत्रालयाने घेतली असून, त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. तसेच ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ या संस्थेने देखील पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे.

या व्हिडिओमध्ये विशालने म्हटलंय की, सेन्सॉर बोर्डमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याशी माझी याप्रकरणी बातचीत झाली. यावेळी त्या अधिकाऱ्याने मला तीन लाख चित्रपट बघण्याचे आणि साडेतीन लाख प्रमाणपत्राचे अशा एकूण साडेसहा लाखाची मागणी केली. याप्रकरणी आपण त्यांना जाब विचारला.

त्यावेळी त्या अधिकाऱ्याने सांगितले, आमच्याकडे आधीच 15 दिवसांपूर्वी आलेले चित्रपट आहेत. त्यांनी आम्हाला चार लाख दिले असताना देखील त्यांचे चित्रपट अजून पेंडिंग राहिले आहेत. माझी नाचक्की झाल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय उरला नाही म्हणून मला त्यांना पैसे द्यावे लागले.

आम्ही जे ही पैसे कमवतो ते आमच्या मेहनतीचे आहेत आणि हे पैसे अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात उध्वस्त होत आहेत, माझ्यासारख्या अभिनेत्याचे असे हाल होतं आहेत. मग सामान्य जनतेनं काय करावं. असा सवाल विशालने प्रशासनाला विचारला. हा पूर्णपणे भ्रष्टाचारचा प्रकार असल्याचे त्याने सांगितले.

विशालने हे पैसे दोन व्यवहारात दिल्याचे सांगितले आहे. एका अकाऊंट मध्ये तीन लाख तर दुसऱ्या अकाऊंट मध्ये साडेतीन लाख अशा प्रकारे सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्याला पैसे देण्यात आले. विशालने याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती.

होणाऱ्या कारवाईवर माझे लक्ष असेल असं देखील विशालने व्हिडिओच्या माध्यमातून यावेळी सांगितलं होतं. हे प्रकरण समोर येताच ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ ने सेन्सॅार बोर्ड अध्यक्षांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच मंत्रालयाने यासंदर्भात ट्वीट करून म्हटलंय की, जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्देवी आहे. यामध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ‘माहिती आणि प्रसारण’ मंत्रालयाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सेन्सर बोर्डाद्वारे Jsfilms.inb@nic.in वर सेन्सॉर बोर्डाच्या छळवणुकीच्या इतर कोणत्याही घटनांबद्दल माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करावे, अशी विनंती ‘माहिती आणि प्रसारण’ मंत्रालयाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com