esakal | प्रसिध्द दिग्दर्शक केवी आनंद यांचे निधन

बोलून बातमी शोधा

tamil director cinematographer kv anand
प्रसिध्द दिग्दर्शक केवी आनंद यांचे निधन
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव सर्वांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे. कोरोनाच्या कचाट्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतो आहे. कोरोनामुळे इतर अनेक साथीच्या आजारांची लागण होऊन जीव जाणा-यांची संख्या अधिक आहे. मनोरंजन क्षेत्रातही कोरोनाचा कहर वाढला आहे. या जीवघेण्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी झगडताना दिसत आहे. अशावेळी त्यांनी चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यानच्या काळात मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे निधन झाले आहे.

प्रसिध्द तमिळ दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर केवी आनंद यांचे हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. टॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. केवी आनंद यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक फोटो जर्नलिस्ट म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी प्रख्यात सिनेमॅटोग्राफर पी सी श्रीराम यांच्यासोबत गोपुरा वसलिले, मीरा, देवर मगन, अमरान आणि थिरुदा थिरुदा सारखे चित्रपट केले. श्रीराम यांनी 1994 मध्ये आलेल्या थेनमावइन कोमब्थ या चित्रपटासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

एक दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद दिला. 2005 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. 2008 मध्ये त्यांनी अयान नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.