चित्रा पहाटे शुटिंग संपवून हॉटेलमध्ये आली, दुसरा दिवस तिनं पाहिला नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

पँडेयिन स्टोअर्समध्ये तिनं केलेली मुल्लाई नावाची व्यक्तिरेखा ही विशेष गाजली होती.

मुंबई - तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री व्ही.जे.चित्रा हिनं आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येनं तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून  तिनं आत्महत्या का केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

28 वर्षीय चित्रा ही तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीची अभिनेत्री होती. पँडेयिन स्टोअर्समध्ये तिनं केलेली मुल्लाई नावाची व्यक्तिरेखा ही विशेष गाजली होती. नजरेपट्टेईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिनं आत्महत्या केल्याचे दिसून आली आहे. तिच्या जाण्यानं तमिळ टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,चित्रा शुटींग संपवून पहाटे अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये आली होती. त्यावेळी ती तिचा होणारा पती हेमंत बरोबर होती. काही महिन्यांपूर्वी तिचा साखरपूडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. तमिळ मधल्या वेगवेगळ्या टीव्ही मालिकांवर तिनं काम केलं होतं. त्यामुळे तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रातील तिचा फॅन फॉलोव्हर मोठा होता. आपल्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोशल मीडियावरही चित्रा सतत अॅक्टिव्ह असायची. फोटो पोस्ट शेयर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहणे तिला आवडत होते.

नैराश्यामुळे चित्रानं अशाप्रकारचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या जाण्यानं चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chitra kamaraj (@chithuvj)

याविषयी एका चाहत्यानं लिहिले आहे की, चित्राचं जाणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं. तिच्या सारख्या अभिनेत्रीनं असा निर्णय घेणं आश्चर्यकारक आहे. ती एक चांगली डान्सर होती. तिची जागा कुणीही घेऊ शकणार नाही.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamilian actress VJ Chithra of Pandian Stores fame dies by suicide