'रा रा रा... रा' सहा दिवसांतच कमाईचे शतक

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आले असून, उत्तर प्रदेश, हरियाना राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही लवकरच चित्रपट टॅक्स फ्री होणार आहे.

मुंबई : 'रा रा रा...रा' म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने सहा दिवसांतच कमाईच्या बाबतीत शतक पूर्ण केले आहे. या चित्रपटाने सहा दिवसांत 107.68 कोटींची कमाई केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आले असून, उत्तर प्रदेश, हरियाना राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही लवकरच चित्रपट टॅक्स फ्री होणार आहे. शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. तानाजीने पहिल्याच दिवशी 15 कोटींचा गल्ला जमावला होता. रविवारी तर या चित्रपटाने तब्बल 26 कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाची कमाई सहा दिवसांत शंभर कोटींच्यावर गेली आहे.

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. हा चित्रपट लवकरच दीडशे कोटींची कमाई पार करेल असेही त्यांनी म्हटले आहे. तानाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.26 कोटी, चौथ्या दिवशी 13.75, पाचव्या दिवशी 15.28 आणि काल बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी 15.28 कोटी अशी एकूण 107.68 कोटी कमाविले आहेत. 

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. तसेच ओम राऊतने दिग्दर्शनाच्या बाबतीत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच काजोल-अजय यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर झळकली असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. सैफ अली खानचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanhaji box office collection Rs 107.68 crore in six days