'तानाजी'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा; तीन दिवसांतच कमाविले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता.

मुंबई : बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूल करणार.. झालंही तसंच! चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांतच चित्रपटाने सुमारे 62 कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आलं. कुठे अजयच्या तानाजीच्या रूपातल्या पुतळ्याला हार घालण्यात आले तर कुठे फटाके फोडून तानाजीला सुरवात कण्यात आली. शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. चित्रपट जाणकारांच्या मते तानाजी पहिल्याच दिवशी 10 करोडची कमाई करेल. पण हे सगळे अंदाज धुडकावत तानाजीने पहिल्याच दिवशी 15 कोटींचा गल्ला जमावला होता. रविवारी तर या चित्रपटाने तब्बल 26 कोटींची कमाई केली आहे. 

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले आहे, की तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.

तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. तसेच ओम राऊतने दिग्दर्शनाच्या बाबतीत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच काजोल-अजय यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर झळकली असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. सैफ अली खानचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय.

छपाकची तीन दिवसांत 19 कोटींची कमाई
दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक या चित्रपटाने तीन दिवसात 19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. छपाकने पहिल्या दिवशी 4.77 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.90 कोटी आणि रविवारी 7.35 कोटी अशी एकूण 19 कोटींची कमाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanhaji The Unsung Warrior Box office collection