esakal | तनिष्कची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात
sakal

बोलून बातमी शोधा

Tanishq pulls down advertisement again

महिन्याभरात दुस-यांदा आपली जाहिरात मागे घेण्याची वेळ तनिष्कवर आली आहे. त्याचे झाले असे की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने एक नवी जाहिरात प्रसिध्द केली आहे.

तनिष्कची दुसरी जाहिरातही वादाच्या भोव-यात

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम


मुंबई -  सासु सुनेचे नाते एका जाहिरातीच्या माध्यमातून दाखविणा-या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्क या दागिने बनविणा-या कंपनीला नेटक-यांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी केलेल्या दुस-या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर वाद पेटला आहे. या नव्या जाहिरातीच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप यावेळी जाहिरातीच्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे.

महिन्याभरात दुस-यांदा आपली जाहिरात मागे घेण्याची वेळ तनिष्कवर आली आहे. त्याचे झाले असे की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने एक नवी जाहिरात प्रसिध्द केली आहे.  त्यात नीना गुप्ता, सयानी गुप्ता, अलाया एफ आणि निम्रत कौर अशा अभिनेत्रींचा समावेश आहे. या दिवाळीत  फटाके वाजवण्याऐवजी काही वेळ आपल्या आईसह घालवणे ती पसंत करेल,असे या जाहिरातीत सयानी गुप्ता म्हणते.यंदा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करा, असे आवाहनही ती करते. दिवाळला फटाके वाजवू नका, नेमका हा जाहिरातीत दिलेला संदेश लोकांना खटकल्याने त्यावरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला.

हिंदूंनी त्यांचा सण कसा साजरा करावा, हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल करत नेटक-यांनी तनिष्कच्या जाहिरातीला विरोध केला.भाजपाचे नेते सी.टी. रवी यांनीही या जाहिरातीला विरोध केला. हिंदूंनी आपला सण कसा साजरा करावा, हे आता दुसरे आम्हाला सांगणार का? कंपन्यांनी आपली उत्पादने विकावीत. आम्ही फटाके वाजवावे की नाही, याबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, असे tweet त्यांनी केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी तनिष्कच्या जाहिरातीत एक आंतरधार्मिक विवाह दाखवून त्यात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम दाखविण्यात आला होता. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.अनेकांनी याप्रकारची जाहिरात ही लव जिहादचा पुरस्कार करत असल्याची टीका केली आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं होते.

या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq चा इशारा दिल्याने  आता ही जाहिरात युट्युबवरुन काढून टाकण्यात आली आहे.